निया शर्मा ‘जिम बॉल’सोबत करू शकली नाही बॅलन्स, म्हणाली ‘अपयशांचा आनंद घ्या’

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा इंडस्ट्रीत तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ही अभिनेत्री तिचे वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी देखील शेअर करते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते, ज्यामुळे ती चर्चेचा भाग बनते. नियाला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे ती तिच्या कौशल्यात सतत भर घालत राहते. त्याचबरोबर नियाला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला आवडते. ती स्वतःला आव्हान देत राहते. अभिनय असो वा वर्कआऊट, ती आव्हानांना तोंड देण्यापासून कधीच मागे हटली नाही. इतर अनेक बी-टाउन कलाकारांप्रमाणे, निया अनेकदा जिम सेशनमधील तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करते.

व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करताना दिसत असते. असाच एक व्हिडिओ नियाने (Nia Sharma) शनिवारी (५ मार्च) तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती जिममध्ये बॉल घेऊन वर्कआऊट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “अपयशांचा आनंद घ्यायला मला हरकत नाही.”

निया शर्मा जिममध्ये बॉल घेऊन दिसली वर्कआउट करताना

व्हिडिओमध्ये तुम्ही ती जिमच्या बॉलवर पाय संतुलित करताना पाहू शकता. अभिनेत्री बॉलवर पाय ठेवून संतुलन राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वारंवार प्रयत्न करूनही तिला तिचा तोल सांभाळता येत नाही. क्लिपमध्ये, अभिनेत्री जिम बॉलसह तिच्या पाय आणि हातांनी वर्कआउट करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

चाहते निया शर्माचे करत आहेत कौतुक

चाहत्यांना नियाचे प्रयत्न पुन्हा-पुन्हा पसंत पडत आहेत. ते तिच्या अपयशाबद्दलही उघडपणे बोलत आहेत. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वर्कआउट ड्रेस परिधान केला आहे. तिने शॉर्ट्ससह ब्रालेट आणि बॅकलेस टॉप परिधान केलेला दिसत आहे.

निया शर्माचे डान्स व्हिडिओ होत आहेत व्हायरल

निया शर्माने सिद्ध केले आहे की, ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर उत्तम डान्सर देखील आहे. सध्या ती कोणत्याही टीव्ही शो किंवा ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम करत नाही. पण ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे ती नियमितपणे तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

निया शिकली पोल डान्स

निया शर्माला डान्सची खूप आवड असल्याने ती गेल्या काही दिवसांपासून ती पोल डान्स शिकत आहे. तिने पोल डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. नियाने अलीकडेच तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती पोल डान्स करताना दिसत होती. निया अनेक कठीण स्टेप्स करत असल्याचे तिच्या व्हिडिओंमध्ये दिसून येते.

हेही वाचा –

 

Latest Post