बॉलिवूडमध्ये नाव कमावणे वाटते तितके सोपे नाहीये. अनेक स्टारकिड्सला त्यांचे आई-वडील प्रसिद्ध कलाकार असूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी जीवतोड मेहनत घ्यावी लागते. मग अशात परदेशातून भारतात यायचे आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणे हे किती कठीण काम असेल, याचा विचार न केलेलाच बरा. मात्र, हेदेखील साध्य करणाऱ्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सनी लिओनी होय. सनीने ‘जिस्म २’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. मात्र, तिला तिच्या कारकीर्दीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये येऊन आता १० वर्षे उलटली आहेत. म्हणजेच एक दशक पूर्ण झाले आहे. मात्र, तरीही इतके वर्षे उलटूनही तिचे मागचे आयुष्य तिला त्रास देण्यासाठी परत येत असल्याचे ती सांगते. मात्र, याचा त्रास करून न घेणे ती शिकली आहे.
काय म्हणाली सनी?
सनीने तिच्या आयुष्याबद्दल बोलताना म्हटले की, “२०१२मध्ये इंडस्ट्रीत प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत, मी पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे. मी माझ्या चांगल्यासाठी विचार करते. मला इथे राहायला आवडते. मला ही इंडस्ट्री आवडते. मी त्या सर्व कामांसाठी खुश आहे, जे मला करायला मिळाले. तसेच, खूप चांगले आणि वाईट पर्यायही आहेत.”
View this post on Instagram
“पण त्या वाईट निवडींमधून चांगल्या गोष्टी आल्या आणि खूप काही शिकायला मिळाले. मला त्याचा प्रत्येक सेकंद आवडतो. मी पहिल्यांदा इथे आले, तेव्हा मला ते तितकं आवडेल याची कल्पनाही नव्हती. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांची मी सदैव ऋणी आहे. कारण, त्यांच्याशिवाय मी इथे नसते,” असेही पुढे बोलताना सनी म्हणाली.
ती म्हणाली की, “जेव्हा मी इंडस्ट्रीत प्रवेश केला, होय, बरेच लोक माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. मात्र, असे बरेच लोक होते, ज्यांना माझ्यासोबत काम करायचे होते. त्यामुळे, काही प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस आणि लोक अजूनही माझ्यासोबत काम करायचे नाहीत.”
“मी यासह पूर्णपणे ठीक आहे. मला विश्वास आहे की, कधीतरी मला यापैकी काही लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि मी याबद्दल उत्सुक आहे. मला याचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल आणि ऑडिशन घेतल्याबद्दल मी अनुराग आणि त्याच्या टीमचे आभार मानते. हे खरोखरच कोणाबाबततरी आहे, जो तुम्हाला संधी देत आहे. आणि हाच योग्य क्षण आहे की, आयुष्य कसे बदलते. मला विश्वास आहे की, माझ्या कारकिर्दीची संपूर्ण गतिशीलता त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत काम केल्यानंतर बदलेल.”
कॅनडाहून येणाऱ्या सनीचे खरे नाव करणजीत कौर असे आहे. तिने ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतल्यानंतर ती भारतभरात चर्चेत आली होती. त्यानंतर तिने ‘एक पहेली लीला’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘रईस’, ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ शनी लिओनी’ आणि ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. अशात तिने दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यपसोबतही एक प्रोजेक्ट साईन केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅनेडियन निर्मात्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ म्हणजे ‘कचरा’, म्हणाला, ‘ऑस्करला गेल्यास भारतासाठी…’
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा
‘…तो चुकीचा सिनेमा बनवत आहे’, आर माधवनने सांगितले आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचे कारण