Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड सुष्मिता सेनने तिसरे मूल दत्तक घेतले? अभिनेत्रीच्या एका फोटोने चर्चांना दिला पूर्णविराम

सुष्मिता सेनने तिसरे मूल दत्तक घेतले? अभिनेत्रीच्या एका फोटोने चर्चांना दिला पूर्णविराम

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने गुरुवारी (१३ जानेवारी) दिवसभर सुरू असलेल्या तिसर्‍या मुलाला दत्तक घेतल्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. कालपासून सुष्मिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या दत्तक मुली रेनी आणि अलिशासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मितासोबत एक लहान मूलही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना वाटले की, सुष्मिताने तिसरे मूल दत्तक घेतले आहे. मात्र आता अभिनेत्रीने तिच्या एका ट्वीटद्वारे सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.

सुष्मिताने (Sushmita Sen) तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिता त्याच मुलासोबत दिसत आहे. सुष्मिताने सांगितले की, या मुलाचे नाव गोडसन ॲमेडियस आहे. फोटोमध्ये गोडसन गाडीच्या बोनेटवर बसला आहे आणि सुष्मिता उभी राहून त्याच्याशी बोलत आहे. फोटो शेअर करताना सुष्मिताने सांगितले की, गॉडसनचे एक्सप्रेशन सर्व काही सांगत आहे. या ट्वीटमध्ये सुष्मिताने गॉडसनच्या आईच्या नावाचाही उल्लेख केला आहे. या गोंडस फोटोचे श्रेय तिने गॉडसनची आई श्रीजया यांना दिले आहे.

आजकाल सुष्मिताचा तिच्या ‘आर्या’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या या सीरीजचे दोन्ही सीझन प्रदर्शित झाले असून, दोन्ही सीझनमधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. वर्षांनंतर सुष्मिताचा अभिनय पाहून तिचे चाहते खूप खूश आहेत. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून सुष्मिताने संपूर्ण जगात देशाचे नाव उंचावले होते.

एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिता सेनसाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणे सोपे नव्हते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम करून देशाचे नाव जागतिक पटलावर प्रस्थापित केले. १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबादमधील एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिता सेनने जगभरातील सौंदर्यवतींना हरवून मिस युनिव्हर्स १९९४ चा किताब जिंकला.

हेही वाचा :

हे देखील वाचा