Wednesday, July 3, 2024

बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी स्वरा आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या तिचे नेटवर्थ

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांतील कामांपेक्षा विवादीत वक्तव्यांमुळे खूप चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे (Swara Bhaskar)  नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या बिंधास्त आणि विवादीत वक्तव्यांमुळे स्वरा भास्कर नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही विषयांवर ती आपले स्पष्ट मत मांडत असते. तिच्या या बिंनधास्त बोलण्यामुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. तर बऱ्याचदा वादही निर्माण झाले आहेत. रविवारी (9 एप्रिल) हिंदी चित्रपट जगतातील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल. 

स्वरा भास्कर ही हिंदी चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. स्वराच्या अभिनयाची आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याची नेहमीच चर्चेत असते. आपल्या कसदार अभिनयाने तिने चित्रपटसृष्टीत स्वःतची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच स्वरा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या बोल्ड आणि हॉट फोटोंची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्वराकडे एकूण 50 लाख डॉलर्सची संपत्ती आहे. तिने आत्तापर्यंत 15 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. इतर कलाकरांप्रमाणे स्वराकडेही महागड्या गाड्यांचा ताफा आहे.ज्यामध्ये ऑडी, मर्सिडिज सारख्या आलिशान गाड्या समाविष्ठ आहेत. स्वराने मोजक्याच चित्रपटात काम केले असले, तरी ती चित्रपटांसाठी मोठे मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ठ आहे. स्वरा एका चित्रपटासाठी 5 कोटी इतके मानधन घेते. स्वराने 2009 मध्ये हिंदी चित्रपट जगतात पदार्पण केले होते. कंगणा रणौत सोबतचा तिचा ‘तन्नू वेड्स मन्नू’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने स्वराला हिंदी चित्रपट जगतात मोठी ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे स्वराचे रांजणा चित्रपटातील अभिनयाचेही कौतुक झाले होते. (actress swara bhaskar birthday net worth of collection)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : अमिताभ बच्चन यांनी अवॉर्ड शोमध्ये पत्नी जया यांना केले होते किस, पाहताच राहिल्या रेखा
जया बच्चन आहेत करोडो संपत्तीच्या मालकीन, वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊया त्यांचे नेटवर्थ

हे देखील वाचा