बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून नेहमी चर्चेत असते. अशातच तिने एक ट्वीट केले आहे, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण स्वराने एका व्हिडिओवर अशी प्रतिक्रिया दिली आहे की, त्यामुळे तिला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.
‘एक हिंदू असल्याची लाज वाटते’
अलीकडेच स्वराने ट्विटरवरील एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओ रिट्विट करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक हिंदू असण्याची लाज वाटते.”
As a Hindu I’m ashamed! https://t.co/26OfIqTeHO
— Swara Bhasker (@ReallySwara) October 22, 2021
स्वराचे हे ट्वीट खूप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जितक्या वेगाने स्वराचे हे ट्वीट व्हायरल होत आहे, तितक्याच वेगाने ती ट्रोल देखील होत आहे. ती नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ट्रोलर्सची शिकार बनते. (actress swara bhasker tweeted as a hindu i am ashamed over namaz disrupte in gurgaon as slogans of jai shri ram raised)
काय आहे या व्हिडिओमध्ये?
स्वराने जो व्हिडिओ रिट्विट केला आहे, तो व्हिडिओ ‘गुरुग्राम’चा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ रिट्विट केल्यामुळे ती ट्विटरवर खूप ट्रेंड होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) गुरुग्राममध्ये मुस्लिम धर्माचे काही लोक तिथे नमाज पडत होते. त्याचवेळी बजरंग दलाचे काही लोक तिथे आले आणि जय श्री राम अशा घोषणा देऊ लागले होते. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ट्रोलर्सला उत्तर
सोशल मीडिया पोस्टवरून ट्रोल होण्याची ही स्वराची पहिली वेळ नव्हती. या आधी देखील ती सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत राहिली होती. तसेच कधी- कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडतात, तर कधी तिला ट्रोल देखील करतात. यावर तिला नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की, “तुला या ट्वीटचे किती पैसे मिळाले.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू हिंदू आहेस याची लाज वाटते.”
असे असले, तरीही तिला अशाप्रकारच्या ट्रोलर्सला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे हे चांगलेच माहिती आहे.
स्वरा आता ‘मँगो’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ती शेवटची सन २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात झळकली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल
-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी
-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला