Friday, April 26, 2024

गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

अभिनेत्री सारा अली खानची हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये गणना होते. नुकतीच सारा अभिनेता रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ शोमध्ये मस्ती करताना दिसणार आहे. तत्पूर्वी सारा अली खानला तिच्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केल जात आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सारा अली खानला गृहमंत्री अमित शाह यांना ट्वीट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे चांगलाच महागात पडले आहे. या ट्वीटमुळे साराला जोरदार ट्रोल केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर मिम्सही व्हायरल होत आहेत.

झाले असे की, सारा अली खान इंस्टाग्रामवर सतत सक्रिय असली, तरीही ट्विटरवर मात्र ती जास्त सक्रिय नसते. याच पार्श्वभूमीवर साराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 22 ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा देण्यासाठी ट्वीट केले होते. तिने “देशाच्या माननीय गृहमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” अशा आशयाचे ट्वीट केले होते. हे साराचे फक्त पाचवे ट्वीट होते. यामुळेच सध्या तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जाव लागत आहे.

साराच्या या छोट्याश्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे, ज्यामधून साराला ट्रोल केले जात आहे. कारण सुशांतसिंग आत्महत्या आणि अं’मली पदार्थ प्रकरणात सारा अली खानचे नाव आले होते, त्यामुळे तिला एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या कारवाईमुळेच सारा अमित शाह यांना मस्का लावत असून कारवाईतून वाचण्यासाठीच हे ट्वीट केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान सारा अली खान लवकरच तिच्या ‘अतरंगी’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. ती शेवटची वरुण धवनसोबत ‘कुली नं 1’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा