बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आणि इतर मुलाखतींमध्ये निर्भीडपणे तिची मतं मांडताना दिसते. नुकतेच तापसीने ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर माध्यमांशी बोलताना तापसी पत्रकारांवर संतापली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तापसीला नेमके झाले तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
तापसी पन्नू (Tapsee Pannu) हिचे ‘शाबाश मिठू’ आणि ‘दोबारा’ हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेत. अशा परिस्थितीत जेव्हा ती एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली, तेव्हा रेड कार्पेटवर पत्रकाराने तिला विचारले की, तुझ्या ‘दोबारा’ चित्रपटाला क्रिटिक्सने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे, यावर तुला काय म्हणायचे आहे? हा प्रश्न ऐकून तापसीला राग आला. ती पत्रकाराकडे वळली आणि त्याला प्रश्न करू लागली. तापसी रागाने म्हणाली, “भाऊ ओरडू नकोस! नाहीतर हे लोक म्हणतील की, कलाकारांना शिस्त नाही.”
व्हिडिओमध्ये तापसीच्या चेहऱ्यावर तिची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर जेव्हा रिपोर्टरला पुन्हा प्रश्न विचारायचा होता, तेव्हा तापसीने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाली, “कोणत्या चित्रपटाविरोधात माेहीम चालली नाही.” यावर रिपोर्टर म्हणाला की, तुम्हाला तुमच्या चित्रपटाबद्दल काय म्हणायचे आहे? यावर तापसी म्हणाली, “कोणत्या चित्रपटाविरोधात मोहीम चालवली गेली? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला उत्तर दिले तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन.” पत्रकाराने जेव्हा तिच्या चित्रपटाचं नाव घेतलं, तेव्हा ती पुढे म्हणाली, “थोडा अभ्यास करून प्रश्न विचारा.” तापसी तिथून हात जोडून पुढे गेली. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘OTT प्ले अवॉर्ड शो’च्या रेड कार्पेटचा आहे.
View this post on Instagram
तापसीच्या या व्हिडिओवर काही चाहते तिच्या समर्थनार्थ कमेंट करत आहेत, तर बहुतेकांनी अभिनेत्रीच्या वागण्यावर कमेंट केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, “जर हे लोक फ्लॉप चित्रपट पचवू शकत नाहीत, तर ते चित्रपट का बनवतात.” दुसर्याने लिहिले की, “ती इतकी का संतापली? असे काय विचारले त्याने?”
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ हा एक काल्पनिक चित्रपट आहे, जो 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 65 लाखांची कमाई केली, तर त्याची एकूण कमाई फक्त 2.89 कोटी रुपये होती. सोशल मीडियावर बॉलिवूड बॉयकॉटच्या ट्रेंडचा फटका या चित्रपटालाही सहन करावा लागल्याचे समजते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी या दोघांनीही अनेक वेळा गंमतीने बाेलले होते की, ट्विटरवर त्यांच्या चित्रपटाच्या विरोधात ‘बायकॉट’चा ट्रेंड चालला पाहिजे. कारण यामुळे चित्रपटाचे प्रमोशन होते. मात्र, जेव्हा ‘दोबारा’ चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर #CancelDobaaraa आणि #BoycottDobaaraa ट्रेंड झाला, तेव्हा दाेघांचीही बाेलती बंद झाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी काय जन्मत: सुंदर नव्हते, खराब मेकअपमुळे रडायचे’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘जवान’ शाहरुख लईच बिझी! तब्बल 200 महिलांसोबत 7 दिवस करणार ‘हे’ काम, निर्मात्यांनी केली तयारी
जरा इकडे पाहा! कारमधून उतरतानाही आलियाला होतोय त्रास, व्हायरल व्हिडिओत स्वत:ला सांभाळताना दिसली अभिनेत्री