‘मी काय जन्मत: सुंदर नव्हते, खराब मेकअपमुळे रडायचे’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

0
59
Nia-Sharma
Photo Courtesy : Instagram/niasharma90

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय अभिनेत्री निया शर्मा हिने तिच्या अभिनयाने आणि बाेल्ड लूकने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. ‘जमाई राजा’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ यांसारख्या दमदार मालिकेत नियाने  काम केले. नुकतेच नियाने तिच्या लूकबद्दल खुलासा केला आहे. इंडस्ट्रीमध्ये कदाचितच काेणती अभिनेत्री असेल, जी स्वत:ला कुरूप समजत असेल. मात्र, निया शर्माने स्वत: स्वीकारले की, ती जन्मत: सुंदर नव्हती.

निया शर्मा (Nia Sharma) हिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की, “तिच्या आयुष्याचा प्रवास फार अवघड हाेता. त्यात अनेक अडथळे आले आहेत.” निया म्हणाली, “सुंदर दिसणं किती गरजेचं असतं हे जेव्हा मला समजले, त्यावेळी यावर मी खूप मेहनत घेतली.” निया पुढे म्हणाली, “मी आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वतःच्या सौंदर्यात वाढ हाेण्यासाठी प्रयत्न केला. स्वत:ला तयार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली.” याविषयी बाेलताना निया पुढे म्हणाली, “सुरुवातीला मला अजिबातच मेकअप करता येत नव्हता. जेव्हा माझा मेकअप खराब हाेत हाेता, त्यावेळी मी खूप रडत हाेते.” नियाने सांगितले की, “मी कुणाच्याही मदतीशिवाय स्वत:मध्ये बदल घडवले आहेत.”

नियाने सांगितले की, “जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले, त्यावेळी मला मेकअप करता येत नव्हते. अशावेळी कुणी कसंही मेकअप करून देत हाेतं.” नियाने पुढे सांगितले की, “अखेर मी स्वत:ला ग्रूम करायला सुरुवात केली. मी युट्यूबवर मेकअप व्हिडिओ बघून मेकअप करण्यास शिकले. त्यानंतर मी इव्हेंट्समध्ये स्वत:चा मेकअप स्वत:च करू लागली. जाेपर्यंत स्टायलिश माझ्याजवळ कोलॅबोरेशन करायला येत नव्हते”. त्यानंतर नियाजवळ अनेक स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आले, जे तिचा मेकअप करू इच्छित हाेते. निया म्हणाली, “ज्यावेळी मला अशा ऑफर येऊ लागल्या, तेव्हा मला खूप आंनद झाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

नियाच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर ती सध्या रियॅलिटी शाे ‘झलक दिखला जा 10’ यात स्पर्धक म्हणून दिसत आहे. नियाला केवळ अभिनयासाठी नाही, तर तिच्या स्टाईलसाठी देखील ओळखले जाते. मात्र, आता निया तिच्या डान्सची झलक दाखवून प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जवान’ शाहरुख लईच बिझी! तब्बल 200 महिलांसोबत 7 दिवस करणार ‘हे’ काम, निर्मात्यांनी केली तयारी
जरा इकडे पाहा! कारमधून उतरतानाही आलियाला होतोय त्रास, व्हायरल व्हिडिओत स्वत:ला सांभाळताना दिसली अभिनेत्री
‘सैराट’ फेम प्रिन्स बाबा आला गोत्यात, अभिनेता सुरज पवारला ‘या’ गंभीर गुन्ह्यात होणार अटक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here