Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवीन वर्ष साजरे करून तमन्ना अन् विजय परतले मुंबईत; व्हायरल व्हिडिओ पाहून डेटिंगच्या चर्चांना उधाण

दक्षिणेतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक तमन्ना भाटिया आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तमन्नाचे नाव सध्या अभिनेता विजय वर्मासोबत जोडले जात आहे, ज्याने साऊथ चित्रपटांसह वेब सीरिजमध्येही धमाल केली आहे. दोघेही गोव्यात एकत्र नवीन वर्ष साजरे करताना दिसले होते, ज्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री तमन्ना आणि विजयचा लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

तमन्ना (tamannaah bhatia) आणि विजय वर्मा (vijay varma) गेल्या काही दिवसांपासून त्यांचा किसिंग व्हिडिओ समोर आल्याने चर्चेत हाेते. हे दोघे गोव्यात एकत्र नवीन वर्ष साजरे करताना दिसले. तमन्ना आणि विजयचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आराम करताना आणि चुंबन घेताना दिसत होते. आता सुट्टी एन्जॉय केल्यानंतर दोघेही मुंबईत परतले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, तमन्ना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, तर विजय वर्मा कॅज्युअल टी-शर्ट आणि ट्राउझर्समध्ये देखणा दिसत होता. नवीन वर्षाच्या पार्टीतून परतल्यानंतर पॅपराझी स्टार जोडप्याची विमानतळावर वाट पाहत होते. मात्र, दोघांना एकत्र पाहण्याची पापाराझींची इच्छा अपूर्ण राहिली. कारण, तमन्ना भाटिया आणि विजय स्वतंत्रपणे विमानतळावरून बाहेर पडले. दोघांच्या या व्हिडिओवर त्यांचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. काही युजर्स तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत, तर काही जण उघडपणे तिला त्यांचे नाते स्वीकारण्यास सांगत आहेत.

तमन्ना भाटिया हिच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर तमन्ना 2023 च्या सुरुवातीला मेगास्टार चिरंजीवीच्या ‘भोला शंकर’ मध्ये दिसणार आहे. यासोबतच ही अभिनेत्री अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ‘जी कर्दा’ या मालिकेतही दिसणार आहे. विजय वर्माबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेता शेवटचा आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’मध्ये दिसला होता. (actress tamannaah bhatia vijay varma return to mumbai after celebrating new year in goa )

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का?’, म्हणत महिला आयोगावर भडकल्या चित्रा वाघ
‘चित्रू, आपण दोघी लवकरच मैत्रिणी होऊ…’, उर्फी जावेदच्या पोस्टने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा