Wednesday, December 6, 2023

तमन्ना भाटियाने शेअर केला खासगी जेटमधील फोटो, चाहत्यांनी विचारले ‘मागे विराट कोहली काय करतोय?’

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते, आता देखील तमन्नाचा एक अनोखा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तमन्नाने तिच्या खासगी विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत आणखी दोन माणसे देखील दिसत आहेत. मागील एका माणसाला बघून सगळ्यांना असे वाटत आहे की, तो विराट कोहली आहे. सगळेजण फोटोला बघून प्रतिक्रिया देऊन तिला प्रश्न विचारत आहे.

हा फोटो तमन्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने असे कॅप्शन दिले आहे की, “ब्रेकफास्ट प्लीज.” तिच्यासोबत असलेल्या तिच्या दोन मेकअप आर्टिस्टसोबत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

एक मेक-अप आर्टिस्ट आहे नीलम केनिया, आणि ज्याला सगळेजण विराट कोहली समजत आहे त्याचे नाव आहे फ्लोरियन हुरेल. तमन्नाच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मागे विराट कोहली आहे का?’ दुसऱ्या काही जणांनी लिहिले आहे की, ‘मागे विराट कोहली काय करतोय?’ अशा अनेक कमेंट तिच्या फोटोवर आल्या आहेत.

या जेटमधून तमन्ना तिच्या एका वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी चालली होती. पण सगळ्यांना असे वाटत आहे की, ती आयपीएलच्या उद्घाटनासाठी चालली आहे. खरंतर तमन्ना तिच्या मेक-अप आर्टिस्ट नीलम आणि आणि फ्लोरियन सोबत हैदराबादला चालली होती. तिथे ती तिच्या ’11th फोर’ च्या प्रमोशनसाठी चालली होती. या वेबसीरिजमध्ये तिने एका व्यावसायिक महिलेची भूमिका पार पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिल्क’ नावाने प्रसिद्ध असलेली तमन्ना बनली बॉक्सर, ‘हे’ चित्रपट ठरले सुपरफ्लॉप
‘जेलमधल्या कैदीसारखी दिसतेस’, मुलानेच उडवली मलायकाच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली

हे देखील वाचा