Monday, July 1, 2024

‘चहा आहे की सरबत’, म्हणत अभिनेत्री तनिषा मुखर्जीच्या ‘या’ फोटोवर नेटकाऱ्यानी केल्या भन्नाट कमेंट

जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि अभिनेत्री काजोलची बहीण असलेली तनिषा मुखर्जी अभिनय आणि बॉलिवूडपासून खूपच लांब आहे. मात्र असे असूनही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या पोस्टमुळे ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय देखील असते. तनिषा अभिनीत लोकप्रिय झाली नसली तरी इंटरनेटवर नेहमीच गाजताना दिसते. नुकताच तनिषाने तिचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून, त काही तासातच चांगलाच व्हायरल झाला आहे.

तनिषा मुखर्जीने (Tanishaa Mukerji) शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा मॉर्निंग लूक दिसत असून, या फोटोमध्ये ती चहा पिताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी आणि माझा चहा नेहमीच चर्चा करतो. जर तू नसला असता तर काय झाले असते. #मूड.” यासोबतच तिने तिच्या सहा फोटोंचे एक रिल देखील शेअर केले आहे. ज्यात ती चहा पीत असताना वेगवेगळ्या सुंदर पोझ देताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लूक अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. मोकळे केस आणि पांढऱ्या रंगाचा ओव्हर साईज टीशर्टमधे दिसणारी तनिषा चांगलाच भाव खाऊन जात आहे.

तनिषाचा हा फोटो पाहून तिचे फॅन्स तिच्या लूकवर घायाळ झाल्याचे दिसत आहे. कमेंट्स करत ते तिच्या सौंदर्याचे आणि लूकचे चांगलेच कौतुक करत आहे. काहींना तर ती एव्हडा चहा पिते हे समजल्यावर हैराणी देखील झाली. एका फॅनने कमेंट करत लिहिले, “एवढा चहा. चहा आहे की सरबत.” दुसऱ्याने लिहिले, “एवढा चहा कोण पिते?” एकाने लिहिले, “चहा नाही कोफी असेल”

दरम्यान तनिषाला देखील आई आणि बहिणीला बॉलिवूडमध्ये जसे यश मिळाले तसे यश मिळवायचे होते. म्हणूनच तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र दुर्दैवाने तिला अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करूनही तनिषा फ्लॉप अभिनेत्री ठरली. यश मिळवण्यासाठी तिने बोल्ड होण्यासही नकार दिला नाही. मात्र तिला यश मिळाले नाही. तनिषाने बिग बॉसच्या घरात देखील स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. नुकताच तनिषाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला.

हेही वाचा :

हे देखील वाचा