×

आम्रपाली दुबेचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, होळीच्या आधीच दिले चाहत्यांना मोठे सरप्राइज

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आम्रपाली दुबे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे नाव अनेकवेळा नेहमीच दिनेश लाल यादव सोबत निरहुआसोबत जोडले जाते. असे म्हटले जाते की, ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतात. या गोष्टीची माहिती तिच्या चाहत्यांशी सोबत संपूर्ण भोजपुरी इंडस्ट्रीला माहित आहे. ती प्रत्येक दिवशी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नीरहुआ देखील तिच्यासोबत खुश दिसत असतो. यातच आम्रपालीचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडिओ होळीच्या सणावर बनवला आहे.

भोजपुरी स्टार आम्रपली दुबेचे होळीचे हे गाणे ‘होलिया मे लागे बडी डर’ यू ट्यूबवर प्रदर्शित केले आहे. हे गाणे यू ट्यूबवर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आले आहेत. या गाण्याला भोजपुरी गायिका खुशबू जैनने गायले आहे. आझाद सिंगने या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच पवन पांडेने या गाण्याचे बोल लिहिले आहे. या गाण्याने यूट्यूबवर धमाल केली आहे. सर्वत्र या गाण्याचे कौतुक होत आहे.

आम्रपाली दुबे ही भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री पैकी एक आहे.‌ अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपाली तिचा डीओपीसोबत व्हायरल गाणे ‘कच्चा बदाम’ वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. हा व्हिडिओ पाहून असे वाटत की, तिने शूटिंगमधून वेळ काढून हा व्हिडिओ बनवला आहे. तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

 

 

Latest Post