बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या आगामी ‘तडप’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आहे. नुकताच तारा सुतारियाने तिच्या प्रमोशनल लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहत्यांसह कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत.
ताराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्राऊन पँट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तारा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. त्याचवेळी तिचा बॉयफ्रेंड आदर जैनही तिच्या या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
आदर जैनने दिली प्रतिक्रिया
ताराचा बॉयफ्रेंड आदर जैन याने तिच्या फोटोवर ब्लॅक हार्ट आणि फायर इमोजी टाकून कमेंट केली आहे. आदर जैन हा रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. त्याचवेळी तारा सुतारियाबद्दल बोलायचं झालं, तर ती या फोटोमध्ये इतकी हॉट दिसत आहे की, जान्हवी कपूर, रईशा राठोड, कोरिओग्राफर अहमद खानची पत्नी शायरा अहमद खान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ताराने ऑगस्ट २०२० मध्ये आदर जैनसोबतचे नाते अधिकृत केले होते.
पुढच्या वर्षी करू शकतात लग्न
माध्यमांशी संवाद साधताना आदर जैन म्हणाला होता की, “तारा माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही दोघे एकमेकांना खूप आनंद देतो. आम्ही खूप एकत्र हँगआऊट करतो आणि आम्हाला लोकांकडून प्रेम मिळते. हे सुंदर आहे आणि मी एवढेच सांगू शकतो.” अभिनेता आदर जैनबद्दलच्या बातम्या देखील आहेत की, तो पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री तारा सुतारियासोबत लग्न करणार आहे.
रणबीरच्या आधी भाऊ होणार नवरदेव
माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आदर आणि ताराचे लग्न निश्चित झाले आहे. हे दोघे नुकतेच गोव्याला रवाना झाले आहेत, जिथे ते लग्नाबाबतचा अंतिम निर्णय घेऊ शकतात. आदरचा चुलत भाऊ रणबीर याच्या आधी दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सन २०२२ च्या सुरुवातीची पाहत आहे वाट
दोघे सन २०२२ च्या सुरुवातीला लग्न करू शकतात. दुसरीकडे, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर २०२२ च्या उन्हाळ्यात हे जोडपे लग्न करू शकतात, अशी चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारा आणि आदर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते आता लग्नासाठी तयार आहेत. ते त्यांच्या नात्याला नवीन नाव देण्यास तयार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत
-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग