Tuesday, May 21, 2024

‘पुकार’ चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण; शूटिंगदरम्यान करीनाने अमिताभ यांचे पाय धरून केली होती ‘ही’ विनवणी

अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, झीनत अमान आणि टीना मुनीम यांचा ‘पुकार‘ हा चित्रपट १८ नोव्हेंबर, १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. रमेश बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कलाकारांच्या आयुष्यात शूटिंग दरम्यान अनेक किस्से घडत असतात. असाच एक आठवणीत राहणारा किस्सा ‘पुकार‘ या चित्रपटाची शूटिंग वेळी घडला होता. जो आज ४० वर्षांनी ऐकला, तरीही आपल्याला हसणे आवरणार नाही. चला तर जाणून घेऊया तो किस्सा.

पुकार‘ या चित्रपटाची शूटिंग चालू होती. बऱ्याच वेळा असे होते की, लहान मूल त्यांच्या आई- वडिलांसोबत शूटिंगवर येत असतात. या चित्रपटाची शूटिंग चालू होती, तेव्हा रणधीर कपूर यांची मुलगी करीना कपूर केवळ ३ वर्षांची होती. ती तिच्या पप्पांच्या शूटिंगवर आली होती. त्या दिवशी नेमका रणधीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये फायटिंगचा सीन होता. ज्यावेळी दिग्दर्शकाने इशारा केला अमिताभ बच्चन यांनी रणधीर कपूर यांना मारण्यास सुरुवात केली. करीना कपूरला हे सगळं खरं‌ वाटलं आणि जोरजोरात रडू लागली. (Pukar films turn 38 years, know some interesting incident happened during shooting)

एवढंच नाही, तर करीना धावत अमिताभ बच्चन यांच्याकडे गेली आणि त्यांचे पाय पकडले. त्यावेळी करीना कपूर केवळ रडत म्हणत होती की, “माझ्या पप्पांना प्लीझ मारू नका.” यानंतर तिथे असलेले सगळेच हसू लागले होते. करीना तिच्या पप्पांना वाचवायला इतक्या जोरात पळत गेली की, तिच्या पायाला जखम झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यावर औषध लावले. हा किस्सा स्वतः अमिताभ बच्चन यांनी शेअर केला होता.

असाच एक मजेशीर किस्सा अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत झाला होता. दिग्दर्शक रमेश बहलचा मुलगा गोल्डी आणि अभिषेक लहानपणीचे मित्र आहेत. दोघेही ‘पुकार’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी ५ ते ६ वर्षाचे असतील. ते दोघे शूटिंगवर आले, तेव्हा तिथे खोट्या तलवारी ठेवल्या होत्या. ते दोघे त्या तलवारी बघून एकदम खुश झाले.

शूटिंग चालू असताना त्या दोघांनी त्या तलवारी घेतल्या आणि खेळायला लागले. मात्र, खेळता खेळता त्या तलवारी तुटल्या आणि त्या दोघांनाही शूटिंगमधून बाहेर काढले होते. या गोष्टीचा खुलासा स्वतः अभिषेक बच्चनने केला होता. तसेच त्याने हे देखील सांगितले की, त्यांना जेव्हा तेथून बाहेर काढले होते, तेव्हा त्या दोघांनी एकत्र चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. त्यानंतर १९ वर्षांनी अभिषेक आणि गोल्डी यांनी ‘बस इतना सा ख्वाब है’ या चित्रपटात एकत्र काम केले.

हेही नक्की वाचा-
World Cupफायनल गाजणार, जगाला वेड लावणारी ‘ही’ गायिका पहिल्यांदाच करणार परफॉर्म
CWC 2023 Final: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाला असं चेचून काढा…’

हे देखील वाचा