Friday, December 20, 2024
[aioseo_breadcrumbs]

टीनाने हनी सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल केली पुष्टी, ट्रोलर्सला दिले चोख प्रतिउत्तर

हनी सिंगने गेल्या वर्षी एका कार्यक्रमात अभिनेत्री टीना थडानीची मैत्रीण म्हणून ओळख करून देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या कार्यक्रमात टीना आणि हनी सिंग एकमेकांचा हात धरताना दिसले. त्याच वेळी, अलीकडेच टीनाने तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. टीना तिच्या कामाबद्दल आणि हनी सिंगसोबतच्या तिच्या नातेसंबंधावर माेकळेपणाने बाेलली. काय बाेली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

सर्वांनाच माहित आहे की, हनी सिंग (honey singh) याची पहिली पत्नी शालिनी तलवार हाेती. हनी सिंग आणि शालिनी यांचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर हनी सिंगने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिले. कारण, 2021 मध्ये शालिनीने हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता, ज्याच्या उत्तरात हनी सिंगने सांगितले की, खोट्या आरोपांमुळे तो खूप दुःखी आणि व्यथित आहे.

अलीकडेच टीनाने एका मुलाखतीदरम्यान यो यो हनी सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. टीनाने सांगितले की, “मी गेल्या वर्षी एप्रिलपासून हनी सिंगला डेट करायला सुरुवात केली, ज्यानंतर आम्ही दोघेही हळूहळू एकमेकांना ओळखू लागलाे. यानंतर माझ्या लक्षात आले की, हनी सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्यासारखा माणूस मिळणे कठीण आहे.” टीना म्हणाली की, “हनी सिंग खूप बुद्धिमान व्यक्ती आहे. मी स्वतः त्यांच्या कामची चाहती आहे.तो ट्रेंडसेटर आहे आणि तो सर्वांपेक्षा वेगळा आहे.”

घटस्फोटानंतर काही महिन्यांनी हनी सिंगने टीनासोबतचे त्याचे नाते सार्वजनिक केले. अभिनेत्री म्हणाली की, “मी कधीच लोकांना त्यांच्या भूतकाळाच्या आधारावर जज करत नाही. मी फक्त त्यांचे काम पाहिले आहे आणि इतरांच्या तुलनेत मी त्यांच्या कामाची चाहती आहे. जेव्हा मी त्याला भेटली, तेव्हा तो मला खूप लाजाळू आणि गोड माणूस वाटला.” टीनाने सांगितले की, ‘ती सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया वाचत नाही. ती ट्रोल्सकडे देखील लक्ष देत नाही.’

हनी सिंगने नुकतेच टीनाबद्दल सांगितले की, “जेव्हा मी टीनाला पहिल्यांदा भेटला, तेव्हा आम्ही दोघेही आपापल्या मित्रांच्या ग्रुपसोबत होते. अशा स्थितीत फारशी चर्चा झाली नाही. त्यानंतर दोघे जेव्हा सेटवर भेटले, तेव्हा मला काहीतरी वेगळे वाटले. मला ती माझीच असल्याचा भास होत होता.” टीना हनी सिंगच्या ‘पॅरिस का ट्रिप’ या गाण्यामध्ये दिसली होती. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडले.(actress tina thadani open up about her relationship with singer honey singh said she dont read trollers comments)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विरुष्काच्या अध्यात्मिक ट्रीपमध्ये दिसला क्युट वामिकाचा खट्याळ अंदाज, व्हिडिओ झाला व्हायरल

‘मी काही वाईट काम करतेय का?’, आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थनाचा प्रतिसवाल

हे देखील वाचा