Friday, September 18, 2026
Home मराठी ‘मी काही वाईट काम करतेय का?’, आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थनाचा प्रतिसवाल

‘मी काही वाईट काम करतेय का?’, आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थनाचा प्रतिसवाल

सिनेसृष्टीमधे अभिनेत्रींना नेहमीच ‘लग्न कधी करणार?’ आणि ‘आई कधी होणार?’ हे दोन प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री देखील अपवाद नाहीत. त्यांना देखील फॅन्स आणि मीडियाच्या अशा प्रश्नांचा सामना करावा लागतो. मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय सुंदर, सोज्ज्वळ आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरे ओळखली जाते. तिने आजवर हिंदी आणि मराठीमध्ये बरेच काम केले आहे. मराठीमध्ये तर प्रार्थनाने चित्रपट, मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवत प्रसिद्धी मिळवली. 

नुकताच प्रार्थनाने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. व्यायसायिक जीवनात यश मिळवलेल्या प्रार्थनाचे वैयक्तिक आयुष्य देखील चांगलेच प्रसिद्ध आहे. तिने २०१७ साली दिग्दर्शक आणि लेखक असणाऱ्या अभिषेक जावकरसोबत लगीनगाठ बांधली. तिच्या लग्नाला बराच काळ उलटला असला तरी तिने अजून आई होण्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

काही महिन्यांपूर्वी प्रार्थना एका शोमध्ये आली होती. तेव्हा त्या शोमध्ये तिला तिच्या फॅन्सने आई होण्याबद्दल विचारले यावर ती म्हणाली, “माझ्या सासूबाई देखील हा शो बघत असतात. मी काही वाईट काम करतेय का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना…, हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. माझ्याकडे पाच पाळीव कुत्रे असून, १२ घोडे, मासे, दोन उंदीर आहेत. ही सर्व माझी मुलंच आहेत. याशिवाय सध्या रील लाइफमध्ये माझ्या मुलीची ‘परीची’ भूमिका साकारणारी मायरा सुद्धा माझी मुलगीच आहे. मला माझी मुलं नकोत. मी या सगळ्यांबरोबरच खुश आहे.”

तत्पूर्वी प्रार्थना सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा या एका मुलीच्या आईची भूमिका निभावत आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थनाने बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजनवर वापसी केली. या मालिकेत तिच्यासोबत श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र लवकरच ही मालिका बंद होणार अशा चर्चा सोशल मीडियावर तुफान गाजत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा