छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले होते. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ माजली होती. आता तिच्या आत्महत्येला दोन आठवडे उलटतील, पण तरीही या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशात तुनिषासोबत काम करणारी अभिनेत्री सोनिया सिंग हिने मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा हैराण करणारा आहे.
अभिनेत्री सोनिया सिंग (Sonia Singh) हिने सांगितले आहे की, तुनिषा शर्माने 3000 हजार रुपये उधार मागितले होते. इतकेच नाही, तर सोनियाने असाही दावा केला की, 14 डिसेंबरला भेट झाली असता, तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) खूपच चिंतेत होती.
चिंतेत असायची तुनिषा
सोनियाने खुलासा केला की, भेटीदरम्यान तुनिषाने शीजान खान (Sheezan Khan) याच्याविषयीही चर्चा केली होती. यादरम्यान तुनिषाने सोनियाला सांगितले होते की, “शीजानला अंतर पाहिजे आणि मी प्रत्येक वेळी प्रेमाबद्दल बोलावं हे त्याला आवडत नाहीये.” सोनियाने सांगितले की, हे ऐकताच तिने तुनिषाला समजावले होते की, “नात्यात हे सर्व होतच असते.” ती पुढे सांगते की, “तुनिषाकडे नेहमीच पैशांची कमतरता असायची. नुकतीच जेव्हा तिने माझ्याकडून 3000 रुपये मागितले, तेव्हा मी तिला विचारले होते की, असे काय झाले, ज्यामुळे तिच्याकडे इतके पैसेदेखील नाहीयेत.”
View this post on Instagram
शीजानवर अनेक आरोप
सोनियाने म्हटले की, “तुनिषा शीजानच्या कुटुंबाला तिचे स्वत:चे कुटुंब समजू लागली होती. इतकेच नाही, तर ती शीजानच्या कुटुंबीयांना अम्मी आणि अप्पी म्हणू लागली होती.” 31 डिसेंबर रोजी शीजानला वसई कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. शीजानवर तुनिषाच्या आईनेही गंभीर आरोप लावले आहेत. तुनिषाची आई वनीता यांनी आरोप लावला आहे की, शीजान तिच्या मुलीला मारायचा आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत होता.
खरं तर, तुनिषा शर्मा हिने 24 डिसेंबर रोजी ‘अली बाबा: दास्तान ऐ काबुल’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे तिला आत्महत्येसाठी उकसवण्याच्या आरोपात तिचा एक्स बॉयफ्रेंड शीजान खान याला पोलिसांनी अटक केली होती. (actress tunisha sharma asked for rs 3000 from her friend days before suicide)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा
आयरा खान हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत खेळली अनाेखा गेम, व्हिडिओ पाहून युजर्सने केलं ट्राेल