Friday, March 29, 2024

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे नाव कमावले आहे. गुरुवारी (5 जानेवारी) दीपिका तिचा वाढदिवस साजरा करत आहे, दीपिका ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत खूप यश मिळवले आहे. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. परंतु तिच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले आहेत. ज्यामुळे ती डिप्रेशनची शिकार झाली होती. तिला आयुष्य नकोस झालं होतं. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील त्या डिप्रेशनबाबत.

नुकतेच अभिनेत्रीने क्लब हाऊस सेशनमध्ये डिप्रेशनबाबत वक्तव्य केले आहे. तिने सांगितले की, “ही 2014 च्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा मी पूर्ण दिशाहीन झाले होते. मला असं वाटतं होतं की, आयुष्य काहीच महत्वाचं नाहीये. याचा काहीच उपयोग नाहीये. मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काहीच जाणीव होत नव्हती. मला अगदी शून्यात असल्यासारखे वाटत होते. खूप महिने हे असंच चालले होते. एकदा माझ्या कुटुंबातील सगळे माझ्या घरी आले होते. जेव्हा ते घरी जाण्यासाठी पॅकिंग करत होते, तेव्हा मी खोलीत बसून रडायला लागले होते. माझ्या आईला जाणवले की, काहीतरी झाले आहे. मी वेगळीच रडत होते. बॉयफ्रेंड किंवा कामामुळे रडतात तसं तर ते नक्कीच नव्हतं.” (Deepika Padukone open ups about her depression said just felt life has no meaning)

तिने पुढे सांगितले की, “माझे रडणे पाहून माझी आई अंदाज लावत होती की, नक्की काय झालं असेल. पण मी कारण सांगत नव्हते. ती मला म्हणाली की, मला साफ दिसत आहे की, डिप्रेशनच्या आधी तू कशी होतीस आणि आता कसा बदल झाला आहे. डिप्रेशनच्या आधी मी खूप चांगले आयुष्य जगत होते. त्यानंतर मला खूप मेहनत करावी लागली होती, जेणेकरून मी मागे परत जाऊ नये.”

दीपिका पदुकोण ही सध्या बॉलिवूडमधील एक टॉपची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटात तिच्यासोबत किंग खान म्हणजेच शाहरुख खान होता. तिने आणि तिचा पती रणवीर सिंगने बऱ्याच चित्रपटात एकत्र केले आहे. त्यांनी ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. तसेच ते त्यांच्या ’83’ या आगामी चित्रपटात देखील एकत्र काम करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणच्या 16 व्या वाढदिवसाला आईवडिलांकडून मिळालेले ‘ते’ गिफ्ट तिच्यासाठी आजही आहे अमूल्य

नम्रता मल्लाच्या हॉटनेसचा कहर; डीपनेक टॉपने वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा