Tuesday, April 16, 2024

आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ट्विंकल खन्ना संतापली; म्हणाली, ‘त्याला तुरुंगात सडवले जात आहे’

बुधवारी (२० ऑक्टोबर) आर्यन खानच्या जामीनाबाबत सुनावणी पार पडली. यादरम्यान न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे आर्यनच्या कोठडीत वाढ झाली आहे. अशामध्ये या निर्णयावर अनेक बॉलिवूड कलाकार आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचाही समावेश झाला आहे. आर्यनला जामीन न मिळाल्याने ट्विंकल नाराज आहे. तिने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विंकलने सोशल मीडियावर आपले मत मांडत रागही व्यक्त केला आहे. इतकेच नाही, तर तिने या संपूर्ण प्रकरणाची तुलना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कोरियन ड्रामा सीरिज ‘स्क्विड गेम’शी केली आहे. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक आहे. यामध्ये काही लोकांना अडकवून गेम खेळली जाते. गेम जिंकण्यासाठी अडकवलेल्या लोकांना टास्क दिले जातात. जो टास्कमध्ये पराभूत होतो, त्याला मारले जाते. (Actress Twinkle Khanna Reacts To Aryan Khans Drugs Case With Stupid Game Reference)

क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यनची अटक आणि पुन्हा जामीन न मिळाल्यामुळे ट्विंकलने या सर्व प्रकरणाची तुलना या वेबसीरिजशी केली आहे. तिने लिहिले आहे की, “प्रत्येक खेळाडूला जिंकण्यासाठी १० मार्बल दिले गेले. दुसऱ्या स्पर्धकाशी टास्क जिंकून मार्बल मिळवायचा आहे. अशाप्रकारे सर्वाधिक मजबूत व्यक्तीला सर्वप्रकारे पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो.”

तिने लिहिले आहे की, “जेव्हा मी शाहरुखचा मुलगा आर्यनच्या अटकेची बातमी वाचली, तेव्हा मला वाटले की, माझे मार्बलही हरवले आहेत. आर्यनच्या मित्रावर ६ ग्रॅम चरस होती. मात्र, आर्यनकडून काहीच सापडले नाही. तरीही तो आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला तुरुंगात सडवले जात आहे.” अशाप्रकारे ट्विंकलने व्यंगात्मक पद्धतीने एनसीबीवर निशाणा साधला आहे.

असे असले, तरीही ट्विंकलने आर्यनच्या अटकेच्या प्रकरणावर मोकळेपणाने आपले मत मांडले आहे. दुसरीकडे अक्षय कुमारने या प्रकरणावर अद्याप मौन बाळगले आहे. त्याने आर्यन आणि शाहरुखबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही.

बुधवारी (२० ऑक्टोबर) आर्यनचा जामीन फेटाळल्याने खान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्यनचे वडील म्हणजेच शाहरुख खान गुरुवारी (२१ ऑक्टोबर) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. तिथे बापलेकात जवळपास १६-१८ मिनिटे चर्चा झाली. शाहरुखने आर्यनशी इंटरकॉममार्फत चर्चा केली. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकार शाहरुखला धीर देण्यासाठी पुढे येत आहेत. शत्रुघ्न सिन्हांपासून ते ऋतिक रोशनपासून अनेक कलाकारांनी या प्रकरणात एनसीबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

हे देखील वाचा