आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

अं’मली पदार्थ प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर, मंगळवारी (२६ ऑक्टोबर) रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी अं’मली पदार्थ बाळगणे, त्याच्याशी संबंधित षडयंत्र, त्याचा वापर, खरेदी आणि तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती.

बुधवारी (२० ऑक्टोबर) विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह उर्वरित आरोपींची जामीन याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करून ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. (aryan khan drug case bombay high court to hear aryan khan bail application)

आर्यनकडे जप्त करण्यासारखे काहीच मिळाले नाही, पण त्याच्या मित्रांकडून अं’मली पदार्थ मिळाली आहेत. अशा परिस्थितीत एनसीबीला संशय आहे की, आर्यन या रॅकेटचा भाग असू शकतो. आर्यनच्या चॅट्समधून एनसीबीला याबाबत बरीच माहिती मिळाली आहे.

व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात आर्यनच्या समस्या
आर्यनचे अभिनेत्री अनन्या पांडेसोबत झालेले चॅट्सही समोर आले आहेत. या चॅट्समध्ये नशेबद्दल संभाषण झाले आहे. आर्यनच्या विरोधात आतापर्यंत एनसीबीचे सर्व युक्तिवाद मुख्यत्वे व्हॉट्सऍप चॅटवरच आधारित आहेत.

आर्यन खान सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. जिथे तो आर्यनसोबत १५ मिनिटे बोलला. तसेच नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा बंगला मन्नतवरही एनसीबीने धाड टाकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

-जामीन मिळवण्यासाठी किंग खानकडे आहेत केवळ सात दिवस, मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहचला अभिनेता

-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

Latest Post