Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पाहायला मिळाला उर्फी जावेदच्या बोल्डनेसचा जलवा, व्हिडिओ तुफान व्हायरल

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पाहायला मिळाला उर्फी जावेदच्या बोल्डनेसचा जलवा, व्हिडिओ तुफान व्हायरल

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी जावेद सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचा १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यावेळी या गाण्याची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की, अनेक लोक हे गाणे पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात होते आणि आजही प्रेक्षकांमध्ये या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता उर्फी जावेदचा या गाण्यावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फीने या गाण्यावर पोझ देतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. उर्फीने तिचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. बॅकग्राऊंडला ‘टिप टिप बरसा पानी’ गाणे वाजत आहे. या गाण्यावर ती तिचा जलवा दाखवत आहे.

आतापर्यंत उर्फीच्या या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहते उर्फीच्या या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी वापरून प्रतिक्रिया देत आहेत.

उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात तिने खूप धमाल केली. उर्फी तिच्या बोल्ड आणि वेगळ्या फॅशन सेन्समुळे घरावर राज्य करत होती. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी सतत तिचा आऊटफिट फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे.

उर्फी आजकाल तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक हटके फोटो शेअर करताना दिसत आहे. यामध्ये उर्फीचा अतिशय बोल्ड लूक दिसत आहे. एवढेच नाही, तर ते शेअर करताच तिचे फोटो इंटरनेटवर पसरले आहेत. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहेतेही खूप इम्प्रेस होतात, पण कधी-कधी तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगलाही बळी पडावे लागते.

उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाली होती, पण तिला लवकरच घरातून बाहेर काढण्यात आले. मात्र, अल्पावधीतच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग खूप वाढली आहे. उर्फीचे सध्या इंस्टाग्रामवर १.८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोव्हर्स आहेत. तिच्या चाहत्यांना संपर्कात ठेवण्यासाठी उर्फी नियमितपणे इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ अपलोड करते.

उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे, हे फार कमी चाहत्यांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. उर्फी जावेदने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो ‘डेढी-मेढी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘नामकरण’, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘जीजी माँ’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने तिची छाप पाडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-याला म्हणतात खरी प्रतिभा! नोरा फतेहीच्या ‘कुसू-कुसू’ गाण्यावर ‘या’ मुलांनी केला धमाकेदार डान्स

-‘बाँब स्क्वाड’ डान्स ग्रूपच्या तीन मुलींनी ‘टिप टिप बरसा पानी’वर केला जबरदस्त डान्स, तुमचेही थिरकतील पाय

-भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मिळवले आणखी एक घवघवीत यश

हे देखील वाचा