अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांच्या डिझाइनमुळे आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा तिचे स्टायलिश व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर उर्फीने हा व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे. यामध्ये उर्फीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती टॉपलेस दिसत आहे.
उर्फीने बाेल्डनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा
उर्फी जावेद (urfi javed) हिने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये उर्फी बोल्ड अवतारात दिसत आहे. उर्फी मरून कलरच्या लेहेंग्यात दिसत आहे. पण, उर्फीला टॉप घालायचा विसर पडलेला दिसतोय! उर्फी जावेदने लेहेंग्यासह टॉप घातलेला नाही. ती लाल रंगाच्या सोफ्यावर बसून मिठाई खाताना दिसत आहे.
उर्फीने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
या व्हिडिओसह उर्फीने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्फीच्या समोर टेबलवर सर्व प्रकारची मिठाई ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्यातुन मिठाई उचलून उर्फी मिठाईचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये “आज जाण्याचा हट्ट करू नकोस…” असे गाणे ऐकायला येत आहे. या व्हिडिओसोबत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
युजर्सने उर्फीला केले ट्राेल
उर्फी जावेदच्या या पोस्टवर युजर्स प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक युजर्स उर्फी खोटे असल्याचे सांगत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हे खूप झाले. लाईक्ससाठी काहीही करू नका.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “हे काय आहे?” एका युजरने तर चक्क असे लिहिले की, “लहान मुले इंस्टाग्राम चालवतात. असे व्हिडिओ टाकू नका.”
पण तुम्हाला माहित आहे का? उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे आणि ती दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते. माध्यमांतील वृत्तानुसार, उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये घेते आणि ती दरमहा 30 लाख रुपये कमवते. तिची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरर! गाैरीनं बिग बाॅसला धमकी देत केलं ‘ब्लॅकमेल’, मग काय करणनं चागंलंच फटकारलं
अभिनेत्री नुसरत भारुचा हिचा ग्लॅमरस लुक! घागऱ्यामध्ये दिले हटके पोज