Monday, July 15, 2024

अरर! गाैरीनं बिग बाॅसला धमकी देत केलं ‘ब्लॅकमेल’, मग काय करणनं चागंलंच फटकारलं

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त ‘बिग बॉस 16‘ च्या ‘वीकेंड का वार’ या लेटेस्ट एपिसोडमध्ये प्रेक्षकांना सलमान खान याची आठवण आली. सध्या सलमान डेंग्यूने त्रस्त असून बरा होत आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 21 ऑक्टाेबर)ला करण जोहरने शाे होस्ट केला होता. बिग बॉसने करणला सलमानच्या तब्येतीची माहिती दिली आणि करणचे स्वागत केले. करण जाेहर याने  बिग बॉसच्या वन लाइनर्सचे कौतुक केले. यानंतर बिग बॉसने करणला घरातील सदस्यांच्या हालचाली पाहण्यास सांगितले. तर करणनेही बिग बॉसला आपल्या पद्धतीने हाताळण्याची परवानगी मागितली.

यानंतर अब्दू रोजिक (Abdu Rozik) अर्चना गौतम (Archana Gautam) हिची चॉकलेट्स चोरताना दिसला. तो चॉकलेट शिव ठाकरे (Shiv Thakare) याला देतो. त्याचवेळी अर्चनाविरुद्ध निमृत कौर (Nimrat Kaur), शिव, मन्या सिंग (Manya Singh) यांच्यासह अनेकांनी आंदोलनं केलं. ते अर्चनाच्या सांगण्यावरूनही कोणतेही काम करत नाही आणि राशन चोरतात. पण जेव्हा गोरी नागोरी उघडपणे कॅप्टन अर्चनाच्या खोलीतील वस्तू बाहेर काढते आणि सर्व नियम मोडते तेव्हा परिस्थिती आणखी बिघडते.

कॅप्टन अर्चना गौतम आणि गोरी नागोरी यांच्यात जोरदार वादावादी हाेते. मात्र, गाेष्ट तेव्हा बिघडते जेव्हा त्या एकमेंकाना अश्लिल शिव्या देऊ लागतात. शिव, एमसी स्टेन आणि इतर अनेकांना पाठिंबा देताे. गोरी अर्चनाच्या खोलीतून ड्रॅगन फ्रूट उचलून आणते आणि अर्चनाच्या चेहऱ्यासमोर ड्रॅगन फ्रूट खात तिची छेड काढते.

यावर गोरी नागोरी तिच्यावर हात उचल्याचा आराेप लावते आणि बिग बाॅसला ‘ब्लॅकमेल’ करत अर्चना विरुद्ध कारवाई करायची मागणी करते आणि जर बिग बाॅस अर्चना विरुद्ध कारवाई करणार नसेल, तर ती स्वतः अर्चनाचे हातपाय तोडेल असेल सांगते. ती बिग बाॅसला कारवाई करण्यासाठी एक तास देते. एक तास पूर्ण केल्यानंतर, गोरी हातात डंबेल घेऊन अर्चनाच्या भोवती फिरते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे सगळे ताेपर्यंत चालले जाेपर्यंत करण जाेहर आत येत नाही  आणि स्पर्धकांना नियम तोडण्यासाठी आणि बिग बॉसला ब्लॅकमेल केल्याबद्दल फटकारत नाही. त्याने गाैरीच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिला फटकारले. याबाबत गाैरीनेही नंतर माफी मागितली आणि पुन्हा असे काही करणार नसल्याचे सांगितले.

यानंतर करण जोहरने कुटुंबातील सदस्यांना “केजेओ के सिटी” या सेगमेंटमध्ये रोमँटिक गाणी आणि सीनवर परफॉर्म करण्यास सांगितले. जे सर्वांनी उत्तमरित्या केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..

ब्रेकिंग! अभिताभ बच्चन यांनी कापली नस, रूग्णालयात दाखल

हे देखील वाचा