बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या जबरदस्त आणि अतिबोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. ती कुठेे जाते, जे काही करते ते सर्व पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते. उर्फीची लोकप्रियता इतकी आहे की, तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ निर्माण होतो. उर्फी जास्त काही प्रोजेक्ट्समध्ये दिसत नाही, पण तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लूकमुळे ती कायम चर्चेत राहते.
उर्फीने शेअर केले फोटो
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या उर्फीने (Urfi Javed) नुकतेच स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाची मोनोकनी परिधान केली आहे. या फोटोंमध्ये उर्फीची सुंदर फिगर दिसत आहे. उर्फीच्या या फोटोंवर काही तासांतच ४० हजारांहून अधिक लाईक्स आले असून सोबतच या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
उर्फी स्विमिंग पूलमधून बाहेर पडताना, न्यूड मेकअप आणि मोकळे केस सोडलेली दिसत आहे. फोटो शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आहे, मला पुन्हा तेथे जायचे आहे, मला बीच खूप आवडतात आणि पाणी देखील.” चाहते आणि युजर्स उर्फीच्या या फोटोंवर कमेंट करून हार्ट अँड फायर इमोजीही पोस्ट करत आहेत. शिवाय तिच्या फिगरचेही कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “खूप सुंदर दिसत आहे.” दुसर्या युजरने लिहिले, “हाय गर्मी, कहर करत आहेस.”
आजकाल उर्फी जावेद सेलिब्रिटी बनली आहे, जिचे चाहते आहेत तसेच ट्रोल करणारेही आहेत. पण तुम्ही तिच्यावर प्रेम करा किंवा ट्रोल करा, तुमची इच्छा असूनही तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. उर्फी जावेदला जेव्हाही मुंबईत स्पॉट केले जाते तेव्हा ती तिच्या वेगळ्याच कपड्यांमध्ये दिसते, आणि त्यामुळे नंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.
हेही वाचा :
‘पिंजरा’ ते ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असा आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास