यावर्षी ‘या’ कलाकारांच्या मृत्यूच्या उडाल्या होत्या अफवा, अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा देखील होता समावेश


सामान्य लोकांपासून ते खास लोकांपर्यंत २०२१ हे खूप सरासरी होते. यावर्षी काही चांगले अनुभव आले तर काही कटू आठवणी देखील आल्या. कोव्हिड-१९ मुळे अनेक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला तर अनेक मोठे कलाकार मरण पावल्याच्या अफवा देखील पसरल्या गेल्या. त्यानंतर त्यांच्या फॅन्सने सुद्धा त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात सुरुवात केली होती. शेवटी या सेलिब्रिटींनी स्वतः लोकांना ते जिवंत आणि निरोगी असल्याचे सांगत मृत्यूच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. जाणून घेऊया की कोणत्या कलाकारांच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या गेल्या.

मुकेश खन्ना :
अभिनेता मुकेश खन्ना हे आजही घरोघरी शक्तिमान म्हणून ओळखले जातात. यावर्षी मे मध्ये कोव्हिड-१९ मुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या खूप बातम्या आल्या. मात्र त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे लोकांना कळवले की ते पूर्णपणे ठीक आहे आणि त्यांना कोरोना नव्हता झाला. त्यांनी असे देखील लिहिले होते की. “तुमच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे. मला कोव्हिड नाही आणि मला कोणत्याही रुग्णालयात देखील दाखल केलेले नाही. माहिती नाही हे अफवा कोणी पसरवली आणि अशा अफवा पसरून त्यांचा हेतू काय आहे हे मला माहिती नाही. अशा अफवा पसरणारे लोक भावनांशी खेळतात.”

परेश रावल :
यावर्षी १४ मे रोजी दिग्गज अभिनेता परेश रावल यांच्या मृत्यूची देखील अफवा पसरली होती. सकाळी उठल्यानंतर त्यांना असे कळाले की त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एक ट्विटमध्ये सांगितले की, ‘मी सकाळी झोपलो होतो म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल.’

लकी अली :
प्रसिद्ध गायक लकी अली यांनाही यावर्षी अशा अफवांचा सामना करावा लागला. लकी अली यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जाहीर केले आणि लिहिलेले, “सर्वांना नमस्कार फक्त अफवांना संबोधित करताना. मी जिवंत आणि ठीक असून, मी घरी शांतपणे विश्रांती घेत आहे. आशा आहे की तुम्ही सुरक्षित आहात देव या काळात सर्वांचे रक्षण करो.”

तबस्सुम :
ज्येष्ठ अभिनेत्री आणि टॉप शोची होस्ट तबस्सुम यांच्या निधनाची देखील अफवा सोशल मीडियावर पसरली होती त्यानंतर तबस्सुम यांनी लिहिले, “तुमच्या शुभेच्छांमुळे मी अगदी ठीक, तंदुरुस्त असून, माझ्या कुटुंबासोबत आहे. माझ्याबद्दल पसरणारी अफवा पूर्णपणे चुकीचे आहे. मी प्रार्थना करते की प्रत्येक जण त्यांच्या घरी सुरक्षित आहे.”

किरण खेर :
ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना या वर्षाच्या सुरुवातील रक्ताचा कर्करोग झाला होता. या रोगामुळे त्यांचे निधन झाले अशी अफवा पसरू लागली होती. त्यांचे पती अनुपम खेर यांनी ही अफवा फेटाळून लावत लोकांना अशा खोट्या बातम्या पसरू नये अशी विनंती केली होती.

मोहन कपुर :
यावर्षी ५ फेब्रुवारी रोजी टीव्ही अभिनेता मोहन कपुर यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरू लागली. मोहन कपूर यांना यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोहन कपूर यांनी स्वतः सर्वांना सांगितले की ते जिवंत आणि सुरक्षित आहे.

मीनाक्षी शेषाद्री :
मीनाक्षी शेषाद्री ८० आणि ९० च्या दशकातल्या लोकप्रिय आणि सुंदर बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक. त्यांच्या मृत्यूची बातमी या वर्षी व्हायरल झाली होती. त्यावेळी कोरोना खूप वेगाने पसरला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल बरेच अंदाज बांधले गेले. या सर्व अफवांना पूर्णविराम देत मीनाक्षी यांनी स्वतः सोशल मीडियावर त्या सुरक्षित असल्याची माहिती दिली होती.

सपना चौधरी :
प्रसिद्ध हरियाणवी डांसर सपना चौधरीच्या मृत्यूची बातमी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक फोन येऊ लागले. यासर्व प्रकरणात सपना चौधरीने स्वतः सर्वांसमोर येऊन सर्व अफवांना फेटाळून लावले. ह्या सर्व गोष्टींचा माझ्या कुटुंबाला खूप त्रासदायक होते असे देखील तिने म्हटले होते.

हेही वाचा – 

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी २०२१ मध्ये खरेदी केली महागडी घरे, किंमती ऐकून गरगरतील डोळे!

अर्रर्र! सलमानच्या ‘राधे’पासून ते अहानच्या ‘तडप’पर्यंत, ‘हे’ चित्रपट २०२१ साली ठरले अपयशी

कडाक्याच्या थंडीमध्ये भररस्त्यात ‘लिप-लॉक’ करताना दिसलं ‘हे’ स्टार कपल, रोमँटिक फोटो व्हायरल

 


Latest Post

error: Content is protected !!