अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी तिच्या कपड्यांवर प्रयोग करण्यासाठी ओळखली जाते. कधी ती ब्लेडने बनवलेला ड्रेस घालून फोटोशूट करते, तर कधी घड्याळाचा ड्रेस घालून लाइमलाइट लुटते. पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीने तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
उर्फी (urfi javed) हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. पण, तिच्या ड्रेसने सगळ्याचे जास्त लक्ष वेधलं आहे. उर्फीने आपले संपूर्ण शरीर बँडेजने झाकले आहे. मात्र, उर्फीने हे केवळ फॅशनसाठी केले आहे. यावेळी तिने स्टायलिश दिसण्यासाठी स्ट्रॅप्ससह ड्रेस तयार करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. उर्फीला पहिल्यांदा पाहून चाहते नाराज झाले असले तरी जेव्हा त्यांना खरं समजले तेव्हा ते उर्फीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
View this post on Instagram
उर्फी जावेदने तिच्या या लूकला हॅलोवीन लूक म्हटले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ,उर्फी ब्लॅक जीन्स आणि व्हाइट टॉपमध्ये दिसत आहे आणि साेबतच तिने हातावर पट्टी देखील बांधलेली दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये थाेड्या वेळातच उर्फी स्ट्रीप स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “उर्फीसाठी प्रत्येक दिवस हॅलोवीन डे असताे. तुम्ही कधी असा विचार करू शकता? पट्टीचा असा प्रयाेग?”
उर्फीच्या या पोस्टवर युजर्सचा रंजक प्रतिसाद येत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीचे सर्वजण कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही कमालीचे क्रिएटिव्ह आहात, तुमची लिपस्टिक शेडही अप्रतिम आहे.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “आमच्या शहरातील डॉक्टरांच्या दुकानातून पट्ट्या गायब झाल्या आहेत, तुम्ही चोरल्या असाव्यात!” आणखी एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले की, “आमचे पेशंट आता तुमच्याकडे ड्रेसिंगसाठी येतील.”
उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेहमी प्रमाने उर्फीच्या व्हिडिओवर अनेकांनी कौतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.(urfi javed shares reel on social media covered her full body with bandages )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाने घेतला गावातील शाळेचा आढावा; म्हणाली, ‘बदलाची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी’
गुरु नानक जयंतीनिमित्त काजोल पोहोचली गुरुद्वारात, पाहा भन्नाट फाेटाे