Sunday, July 14, 2024

उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? म्हणाली,’जुन्या गोष्टी विसरलो…’

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद(Urfi Javed) अनेकदा तिच्या आगळ्यावेगळ्या कपड्यांमुळे आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येकवेळी उर्फी तिच्या पोशाखांसोबत अतरंगी प्रयोग करून लोकांना आश्चर्यचकित करते. मात्र, यावेळी ही टेलिव्हिजन अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. उर्फी जावेद आणि पारस कलनावत (Paras Kalnawat) यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालं आहे. आता उर्फीनेच या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

अभिनेत्रीच्या चाहत्यांना माहित असेल की एकेकाळी उर्फी टेलिव्हिजन मालिका ‘अनुपमा’मध्ये ‘समर’ची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एकमेकांना डेट केले होते. इतकेच नाही तर पारसने उर्फीसाठी त्याच्या शरीरावर टॅटूही काढला होता. आता सांगायचे झालं तर वर्षापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आहे, परंतु अलीकडे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि सोशल मीडियावर अनेकदा बोलताना दिसत आहे.

काय म्हणाली उर्फी जावेद?
पारससोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, आता त्यांच्यामध्ये असे काहीही होणार नाही. माध्यमाला दिलेल्या मुलाखती दरम्यान उर्फीने सांगितलं की पारस माझं फक्त एक चांगला मित्र आहे. पुढे ती म्हणाली, ‘मी त्याला माझं वाढदिवशी फोन केला आणि तो आला पण आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये नाही. आमच्यात फक्त मैत्रींचे नाते आहे आणि आम्ही गेलेले दिवस पूर्णपणे विसरलो आहोत.

15 ऑक्टोबर रोजी उर्फी जावेदने गोव्यात आपल्या मित्रांसोबत वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यादरम्यान अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पारस कलनावटही उपस्थित होता. याशिवाय पारसने अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छाही दिल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर चाहत्यांना जाणून घ्यायचे होते की उर्फी पुन्हा एकदा पारसला डेट करत आहे का? यावर आता उर्फीने स्वतःच उत्तर दिले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधीही उर्फीने पारससोबतच्या तिच्या नात्याचे अनेकवेळा ‘बालिशपाण’ असे वर्णन केले आहे. उर्फी जावेदने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला त्याच्यासोबत ब्रेकअप करायचे होते, तो खूप पझेसिव्ह होता. त्याने माझ्या नावाचे 3 टॅटू बनवून मला पुन्हा प्रभावित करण्याचा प्रयत्न केला पण एकदा वेगळे झाले तरी पुन्हा असे कोण करते?

दरम्यान पारस आणि उर्फी जावेद यांची ओळख ‘दुर्गा’ मालिकेच्या सेटवर झाली होती. याच सेटवर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. उर्फीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘अनुपमा’ मालिकेत तिला महत्त्वपूर्ण भूमिका मिळत होती मात्र पारसने निर्मात्यांना सांगून तिला मालिकेतून बाहेर केलं. याशिवाय या दोघांनी ब्रेकअपनंतर एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अशाता आता पुन्हा एकादा त्यांना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, सोशल मीडिया पोस्टमधून केले खबरदारीचे आवाहन

हे देखील वाचा