‘बिग बॉस ओटीटी‘मध्ये दिसलेली उर्फी जावेद आता सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. उर्फी तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि अनेकदा ती तिच्या ड्रेसींगसेन्समुळे ट्रोलच्या निशाण्यावरही येते. पण आपल्या स्पष्टवक्त्या वक्तव्याने तिने ट्रोल्सचे तोंडही बंद केले आहे. उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये जास्त काळ टिकू शकली नसली तरी ती आता तिच्या दुसऱ्या रिऍलिटी शोसाठी सज्ज झाली आहे. उर्फी जावेद ‘स्प्लिट्सविला एक्स4’मध्ये दिसणार आहे.
स्प्लिट्सविला एक्स4 (splitsvilla x4) शोचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये उर्फी जावेद (urfi javed) सर्व स्पर्धकांवर रागावताना दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, उर्फी शोच्या सर्व स्पर्धकांना रागाने म्हणते, “तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोणाशी बोलत आहात?” प्रोमो पाहून असाही अंदाज वर्तवला जात आहे की, कदाचित उर्फीमध्ये काही पाॅवर असेल. प्रोमोमध्ये उर्फीला पाहिल्यानंतर चाहतेही उत्साहित झाले आहेत.
View this post on Instagram
उर्फी आहे राेमॅंटिक?
स्प्लिट्सविला एक्स4 मध्ये सहभागी झाल्याबद्दल उर्फी जावेद म्हणाली, “मी बर्याच वर्षांपासून स्प्लिट्सविला एक्स4 ला फॉलो करत आहे आणि या डेटिंग रिऍलिटी शोचा एक भाग बनणे काही वेड्यापणापेक्षा कमी नाही. शो तुमची परिपूर्ण जाेडी शोधण्याबाबत आहे. यात काहीही शंका नाही की, मी खूप रोमँटिक आहे त्यामुळे मला या शोचा भाग व्हायचे होते.”
‘स्प्लिट्सविला एक्स4’ 12 नोव्हेंबरपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
यावेळी स्प्लिट्सविला एक्स4 मध्ये सनी लिओनी रणविजय सिंगसोबत दिसणार नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीसाेबत दिसणार आहे. रणविजय सिंग अनेक वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन करत होता, परंतु यावेळी काही कारणांमुळे तो करू शकला नाही. ‘स्प्लिट्सविला एक्स4’ 12 नोव्हेंबरपासून Voot आणि MTV वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामावर सलमान खान झाला खूश; म्हणाला, ‘बाल तस्करी हा…’
इलॉन मस्क येताचं एम्बर हर्डने ट्विटरला केलं अलविदा; नेटकरी म्हणाले, ‘ब्लू टिकसाठी तिच्याकडे पैसे…’