Friday, July 5, 2024

हद्दचं झाली राव! उर्फी जावेदच्या नव्या लूकने नेटकरीही चक्रावले, कपडे न घालता फक्त…

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद  तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कपडे न घालता फोटोशूट केले आहे.

आपल्या अनोख्या पेहेराव्याने सर्वांना थक्क करणाऱ्या उर्फी(Urfi Javed) हिने पुन्हा एकदा आपल्या बाेल्ड लूकने चाहत्याना आश्चर्य चकित केलं आहे. बुधवारी, उर्फीने नुकताच तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी कपड्यांशिवाय दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फी टॉप न घालता कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

व्हिडिओमध्ये उर्फीने टॉप न घालता शरीर झाकण्यासाठी चमकदार लाल रंगाची चमकी लावली आहे. त्यासोबतच तिने गळ्यात हॅरी नेकपीस घातला असुन खाली लाल रंगाचा स्कर्ट घातला आहे. यासाेबत तिने केसांचा अंबाडा बनवला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ये तेरी नजर आ कुसूर है…!”

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

युजरने केलं उर्फी जावेदला ट्राेल
उर्फी जावेद नेहमी प्रमाणे यावेळीही ट्राेलर्सच्या निशाण्यावर आहे. युजर तिच्या या लूकला बघूण आश्चर्य चकित झाले आहे. जिथं काही चाहते तिच्या लूकची प्रशंसा करत आहे तर काही युजर तिला ट्राेल करत आहे. यावर कमेंट करत युजर तिली कपडे घालण्यासाठी सल्ला देत आहे.

याआधी उर्फी ब्रॅलेटमध्ये एअरपोर्टवर पोहोचली होती. तिच्या त्या बाेल्ड लूकवर युजरने तिला खूप ट्रोल देखील केले हाेते.  इतकेच नाही तर त्याआधी उर्फीने तिचा आउटफिट आरशांनी तयार केला होता. या आउटफिटमध्ये उर्फीने तिच्या छातीवर आणि चेहऱ्यावर आरसे चिकटवले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा :
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! लेक पलकमुळे कंगाल झाली श्वेता तिवारी, व्हिडिओतून झाला खुलासा

मोठी बातमी! 6 वर्षे नांदली अभिनेत्री अन् आता ‘या’ कारणामुळे दिला पतीला घटस्फोट

हे देखील वाचा