Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. अलीकडेच, उर्फीने एक वेगळाच ड्रेस परिधान करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तिचा हा नवीन लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उर्फीचा विचित्र ड्रेस
उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा फाटक्या-तुटक्या स्टाईलचा ड्रेस परिधान केला. जेव्हा तिने फाटक्या ड्रेसमध्ये मीडियासमोर एन्ट्री केली, तेव्हा लोक तिच्याकडे बघतच राहिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उर्फी कोणत्याही प्रकारच्या पोशाखात कंफर्टेबल असते. मात्र, इतरांना तिचे कपडे पाहून अस्वस्थ वाटते. या व्हिडिओमध्ये उर्फी चाहत्यांसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बिग बॉस ओटीटी’मध्ये झलकलीय उर्फी
उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी तिने फॅशन डिझायनर म्हणूनही काम केले होते. याशिवाय उर्फी यावर्षी ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही दिसली आहे. याशिवाय उर्फी अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून चर्चेत असते.

लखनऊ येथे झाला जन्म
उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर, १९९६ मध्ये उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये झाला होता. उर्फीच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या आईचे नाव झाकिया सुलताना आहे. उर्फीला एक बहीण आहे, तिचे नाव डॉली जावेद आहे.

उर्फीची कारकीर्द
नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करत होती. २०१६ मध्ये उर्फीला ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टेलिव्हिजन मालिकेतून ब्रेक मिळाला. या मालिकेत तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तिला दुसऱ्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘चंद्र नंदिनी’ या मालिकेत उर्फीने राजकुमारीची भूमिका साकारली होती. येथून तिला ओळख मिळाली. यानंतर ती ‘मेरी दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपनाह’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ

हे देखील वाचा