[rank_math_breadcrumb]

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात; एक जखमी तर दुसऱ्याचा जागीच मृत्यू

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माते महेश कोठारे यांचे उर्मिला कानेटकर कोठारे हिच्या गाडीचा एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आलेली आहे. मुंबईतील कांदिवली या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. तिच्या गाडीने दोन व्यक्तींना उडवलेले आहे. अत्यंत मोठ्या स्वरूपात हा अपघात झालेला आहे. या अपघातात एका व्यक्तीच्या जागेवरच मृत्यू झालेला आहे, तर दुसरा व्यक्ती हा अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यावर उपचार चालू झालेले आहेत. या अपघातात अभिनेत्रीचा ड्रायव्हर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे दोघीही जखमी झालेले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मुंबईतील कांदिवली या ठिकाणावरून तिचे शूटिंग संपवून घरी परत जात असताना हा अपघात घडलेला आहे. मुंबईतील कांदिवली येथील पोईसर मेट्रो स्टेशन जवळ गाडीचा वेग अचानक वाढल्याने मेट्रोचे काम करत असणाऱ्या दोन मजुरांना अभिनेत्रीच्या गाडीने उडवलेले आहे. या अपघातात एका मजुराच्या जगूच मृत्यू झालेला आहे. तर दुसरा व्यक्ती हा गंभीर रित्या झालेला आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्रीला देखील मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहेम वेळेवर एयर बॅग्स उघडल्याने उर्मिलाचे प्राण वाचले असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

रात्री शूटिंग संपून घरी जात असताना गाडीवरील वेग खूप जास्त असल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटला. आणि त्या गाडीने रस्त्याच्या कडेला मेट्रोचे काम सुरू असलेल्या 2 मजुरांना उडवले. या सगळ्या प्रकाराने मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे .अभिनेत्रीच्या प्रकृती बद्दल संपूर्ण माहिती अजूनही समोर आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

ऋतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानने घेतला भाड्याने फ्लॅट; दरमहा देणार इतके लाख भाडे
प्रियांका चोप्रा होणार राजामौलींच्या 1000 कोटींच्या चित्रपटाचा भाग? या अभिनेत्यासोबत जमणार जोडी