Tuesday, July 9, 2024

दृष्ट लागावी इतके सुंदर आहे उर्मिला कोठारेचे सौंदर्य, फोटोवर खिळल्या लाखो नजरा

मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. अनेकवेळा ती तिच्या मुलीला देखील डान्स शिकवताना दिसते. अशातच उर्मिलाचे पाखी फोटो समोर आले आहेत.

उर्मिलाने पारंपारिक वेशात काही फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहेत. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, उर्मिलाने गुलाबी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी नेसली आहे. तिने गळ्यात मोत्याचा हार, हातात बांगड्या, केसात गजरा, नाकात नथ असा सगळा साज-शृंगार केला आहे. फोटोमध्ये ती एका झोपाळ्यावर बसलेली दिसत आहे. अगदी दृष्ट लागावी असे तिचे मनमोहक सौंदर्य दिसत आहे. (Actress urmila kothare share her traditional look photos on social media)

तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहे. तिचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर गिरिजा ओक हिने “सो प्रीटी” अशी कमेंट केली अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोला २६ हजारापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकण’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्या सोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा