Tuesday, July 9, 2024

‘मृत्यूपूर्वीही आणखी एक मृत्यू असतो…’, उर्वशीची खळबळजनक पोस्ट व्हायरल, चाहत्यांना आठवला रिषभ

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशातच उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच साेशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. तिने नो मेकअप लूकमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

इंस्टाग्रामवर अनेकदा उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. अशातच तिने एक अतिशय साधा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशीने साडी नेसलेली असून ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. उर्वशीचे फोटो पाहून असे वाटते की, हा तिचा चित्रपट किंवा जाहिरातीसाठी शूट केलेला फोटो आहे. फोटो थोडा अस्पष्ट आहे, ज्यामध्ये उर्वशी टेरेसवर उभी असलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मृत्यूपूर्वीही आणखी एक मृत्यू असतो, तुमच्या प्रेमापासून दूर होऊन एकदा पाहा.” यावेळी उर्वशीच्या फोटोची नाही, तर कॅप्शनचीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावर एक युजरने लिहिले की, “रिषभ कमेंट करून टाक.” त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया युजर्स उर्वशीचे कौतुक करताना दिसत आहेत.

अलीकडेच उर्वशी रौतेलाने इंस्टा स्टोरीवर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत एका रोमँटिक व्हिडिओ शेअर केला होता, जो एका चाहत्याने एडिट केला होता. त्यानंतर अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत उर्वशीने कोणाचेही नाव न घेता प्रतिक्रिया देत तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “काही दिवसांपूर्वी माझ्या टीमने काही चाहत्यांनी बनवलेले एडिटेड व्हिडिओ मला नकळत शेअर केले होते. प्रसारमाध्यमांना विनंती आहे की, याविषयी बातम्या देऊ नयेत. तुम्हा सर्वांचे आभार आणि खूप प्रेम.”

उर्वशी रौतेलाने ‘सिंग साब द ग्रेट’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीने कन्नड चित्रपट ‘मि. ऐरावता’ मध्ये दिसली होती. त्यानंतर ती ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’, ‘पागलपंती’ अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय उर्वशीकडे आणखी 2 चित्रपट आहेत, ज्यात एक हिंदी ‘दिल है ग्रे’ आणि एक तेलुगू ‘ब्लॅक रोझ’ आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ची विक्रमी कमाई; आलिया म्हणाली…
भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’
‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान

हे देखील वाचा