Friday, April 19, 2024

ऐश्वर्या रायपासून ते उर्वशी रौतेलापर्यंत ‘हे’ बॉलिवूड स्टार्स झाले ‘या’ आठवड्यात ट्रोल झाले

सोशल मीडिया आल्यापासून जिथे बॉलीवूड सेलिब्रिटींचे आयुष्य सोपे झाले आहे, तिथे ट्रोल करणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. सेलिब्रिटींच्या पेहरावापासून ते त्यांच्या वक्तव्यापर्यंत लोक बारीक नजर ठेवतात. सेलिब्रिटी कुठल्याही बाबतीत चुकला तर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला युजर अजिबात देरी करत नाही. त्याचवेळी युजर अभिनेत्रीच्या ड्रेसिंगबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा सेलिब्रिटींनाही लोकांच्या टीकेला बळी पडावे लागते. या आठवड्यात सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऐश्वर्या राय आणि उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केले.

ऐश्वर्या राय
अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya rai)तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. आजही लोक ऐश्वर्याच्या सौंदर्याचे वेडे आहेत. पण या आठवड्यात ऐश्वर्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. ऐश्वर्या ‘पोन्नियान सेलवन’च्या ट्रेलर ओपनिंगला पोहोचली होती. त्यावेळी ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. पण ट्रोलर्सनी तिला प्लास्टिक सर्जरी आणि फेक एक्सेंट म्हणून टोला मारला. ऐश्वर्याच्या फोटोवर कमेंट करताना यूजर्सनी तिला सुंदर नसून बूटॉक्स चे दुकान असल्याचे संबोधले. सोबतच ऐश्वर्याच्या एक्सेंटचीही खिल्ली उडवली.

उर्वशी रौतेला
या आठवड्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. नुकत्याच झालेल्या आशिया चषका दरम्यान भारताचा पाकिस्तानकडून सामना हरला होता. या सामन्यादरम्यान उर्वशी रौतेलाही पोहोचली. पराभवानंतर लोकांनी ऋषभ पंतच्या कमकुवत कामगिरीसाठी उर्वशीला जबाबदार ठरवले. तसेच काही यूजर्सनी उर्वशीला जोरदार ट्रोल देखील केले.

सोहेल खान
बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची (sohail khan) एक्स पत्नी सीमा सजदेह हिलाही सोशल मीडिया यूजरने फटकारले. सीमा सजदेह  ‘The Fabulous Lives of Bollywood Wives’मध्ये आली होती. यावरून सोशल मीडिया यूजर्समध्ये नाराजी पसरली होती.

रणबीर कपूर
रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट या आठवड्यात खूप चर्चेत आहे. यासोबतच लोकांनी रणबीर कपूरलाही खूप ट्रोल केले. बीफ बाबतच्या जुन्या वक्तव्यावरून लोकांनी रणबीरला प्रचंड घेरलं. एवढेच नाही तर उज्जैनला पोहोचलेल्या रणबीरला लोकांच्या रागाला सामोरे जावे लागले. यामुळे रणबीर बाबा महाकालचे दर्शनही करू शकला नाही.

दैनिक बाेंवबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

प्रेम हे! मिलिंद सोमणने निळ्या आकाशाखाली पत्नी अंकिताला केले किस; व्हिडिओवर खिळल्या सर्वांच्या नजरा

काकांच्या निधनानंतर दु:खाच्या सागरात हरवला प्रभास; ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ व्हायरलईशा गुप्ताच्या बोल्डनेसचा कहर! फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘दुसरी कीम कार्दशियन…’

हे देखील वाचा