रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत आहे. या युद्धाचा फटका निष्पाप लोकांना बसत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला नशीबवान होती की, ती वेळेत आपल्या देशात परतली. उर्वशीने युद्धाच्या दोन दिवस आधी एक तणावपूर्ण किस्सा सांगितला, ज्यामुळे तिला शूटिंग सोडावे लागले. उर्वशी युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शिमहल यांची भेट घेणार होती, पण ती रद्द करावी लागली. खरं तर, युक्रेन हे बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांसाठी आवडते शूटिंग डेस्टिनेशन मानले जाते. त्यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण तिथेच होते.
युक्रेनहून परतलेल्या उर्वशीने (Urvashi Rautela) एका मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा ती शूटिंग करत होती, तेव्हा तणावपूर्ण वातावरण होते. युक्रेनमधील परिस्थिती पाहून उर्वशीचा भाऊ खूप अस्वस्थ झाला. मात्र, उर्वशीचे वडील काही कामासाठी तिथे हजर होते, त्यामुळे त्यांना खूप सुरक्षित वाटले.
पण बिघडलेली स्थिती पाहून उर्वशीच्या टीमने युद्धाच्या दोन दिवस आधी परतण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे ती भारतात परतली. आता टीव्हीवर युद्धाची परिस्थिती बघून ती खूप घाबरली आहे. उर्वशीने आशा व्यक्त केली आहे की, युद्ध लवकरच संपेल आणि त्यानंतर ती युक्रेनमध्ये आपले काम पुन्हा सुरू करू शकेल. तसेच उर्वशीने युद्धात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुलाखतीदरम्यान ती खूपच घाबरलेली दिसत होती.
उर्वशी रौतेला तिच्या आगामी तमिळ चित्रपटाच्या शूटिंगसाठी युक्रेनमधील कीव आणि ओडेसा येथे गेली होती. याशिवाय तिचा युक्रेनियन गायक दिमित्री मोनाटिकसोबतही एक प्रोजेक्ट होता, जो युद्धामुळे पुढे ढकलला गेला आहे.
उर्वशीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने ‘हेट स्टोरी ४’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘पागलपंती’, ‘सनम रे’, ‘सिंग साहब द ग्रेट’ यांसारख्या चित्रपटांत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिच्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळाला आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशी लवकरच रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिचा ‘ब्लॅक रोज’ हा थ्रिलर चित्रपटही लवकरच पाहायला मिळणार आहे. याचबरोबर उर्वशी ‘थिरुत्तू पायल २’ च्या हिंदी रिमेकमध्येही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच उर्वशी अरब फॅशन वीकमध्ये दिसली होती. जिथे ती सुमारे ४० कोटींचा सोन्याचा ड्रेस परिधान करून वॉक करत होती.
हेही वाचा-