Thursday, March 28, 2024

बापरे! ‘किंग खान’ला वाटते ‘या’ गोष्टीची भिती; अनुष्काने दिला होता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला

हिंदी चित्रपट जगताचा बादशहा म्हणून अभिनेता शाहरुख खानची ओळख आहे. शाहरुख खानचे चित्रपट, त्याची लाईफस्टाईल अशा प्रत्येक गोष्टीची नेहमीच चर्चा होत असते. शाहरुख खान इतका प्रचंड मोठा चाहतावर्ग, स्टारडम आणि प्रसिद्धी क्वचितच एखाद्या अभिनेत्याला मिळते. त्याच्या चित्रपटांइतकीच त्याच्या डॅशिंग व्यक्तिमत्वाची चर्चा होत असते. मात्र, असे असूनही बॉलिवूडच्या किंग खानला एका गोष्टीची प्रचंड भिती वाटते, काय आहे ती गोष्ट ज्याला किंग खान घाबरतो चला जाणून घेऊ. 

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात डॅशिंग आणि यशस्वी अभिनेता म्हणून शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) नावाची चर्चा होत असते. आपल्या अभिनयाने शाहरुख खानने हिंदी चित्रपट जगतावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होत असते. मात्र, हिंदी चित्रपट जगतातील या दिग्गज अभिनेत्यालाही एका गोष्टीची प्रचंड भिती वाटते. याबद्दलचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दिग्दर्शक साजिद खान आणि रितेश देशमुखच्या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा सहभागी झाले होते. यावेळी एका खेळामध्ये अनुष्का शर्माला शाहरुख खानला वाटणाऱ्या त्याकोणही एका भीतीचा उल्लेख करण्यास सांगितला होता. अशाप्रकारे शाहरुख खानलाही तिच्याबद्दल माहित नसलेल्या एका गोष्टीची माहिती देण्यास सांगितली होती.

या कार्यक्रमात शाहरुखने त्याला त्याचा हात कापला जाण्याची सगळ्यात जास्त भिती वाटत असल्याचे सांगितले आहे. त्याच्या या खुलाश्यावर अभिनेत्री अनुष्का शर्माने खिल्ली उडवली होती. मात्र, याचा खुलासा करताना सांगितले की, हीच त्याची सगळ्यात मोठी भिती आहे. त्याच्या या खुलाशाने त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते.

याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला की, तो हात पसरवून जी स्टाईल करतो त्यावेळी कोणीतरी त्याचा हात खालून कापण्याची त्याला भिती वाटत असते. त्याच्या या बोलण्यावर साजिद खानने त्याची फिरकी घेत, “तू शोले चित्रपटाचा फॅन आहेस का?” असे विचारले. किंग खानच्या या खुलाश्यावर अभिनेत्रीने त्याला दवाखान्यात जाण्याचाही सल्ला दिला आहे. यावर शाहरुख  खानने म्हटले की, “मी डॉक्टरांकडे गेलो होतो. मात्र, त्यांनी यापेक्षाही मोठेमोठे प्रोब्लेम असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.”

सोबतच शाहरुख खानने त्याला झोक्यावर बसायचीही भिती वाटत असल्याचा खुलासा केला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा