Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड ‘जर तुम्हाला स्वत:ला…’, रिषभ पंतबद्दलच्या पोस्टमुळे ट्रोल झाल्यानंतर भडकली उर्वशीची आई, पोस्ट व्हायरल

‘जर तुम्हाला स्वत:ला…’, रिषभ पंतबद्दलच्या पोस्टमुळे ट्रोल झाल्यानंतर भडकली उर्वशीची आई, पोस्ट व्हायरल

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मागील वर्षाच्या अखेरीस भीषण अपघात झाला. त्यात त्याला गंभीर दुखापतही झाली. अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर देशच काय तर जगभरातून तो बरा होण्यासाठी प्रार्थनांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची आई मीरा रौतेला यांचाही समावेश होता. त्यांनी पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ट्रोलर्सनी या मायलेकींना जोरदार ट्रोल केले होते. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मीरा यांनी रिषभ पंतसाठी केली होती प्रार्थना
सोशल मीडियावर मीरा रौतेला (Meera Rautela) यांनी अपघातग्रस्त रिषभ पंत (Rishabh Pant) हा लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करणारी पोस्ट लिहिली होती. त्यांनी पंतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “सोशल मीडियाच्या अफवा एकीकडे आणि तुम्ही ठणठणीत होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव रोशन करणे दुसरीकडे. तुम्ही सर्वजण प्रार्थना करा.” यासोबतच त्यांनी #Godblessyou आणि #RishabhPant या हॅशटॅग्जचाही समावेश केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Rautela (@meera_rautela)

युजर्सने मायलेकीला केले ट्रोल
या पोस्टनंतर मीरा यांना जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेक युजर्सनी त्यांना जावयाची चिंता न करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, काहींनी मीराच्या या पोस्टला दिखावा म्हणत मायलेकीला ट्रोल केले होते. यावर आता अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिच्या आईने रिऍक्शन देत टीका करणाऱ्यांवर लक्ष न देण्याबाबत भाष्य केले आहे.

मीरा यांनी केली ट्रोलर्सची बोलती बंद
बुधवारी (दि. 04 जानेवारी) मीरा यांनी दुबईहून त्यांचा एक फोटो पोस्ट करत नाव न घेता टोमणा मारणारी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “जर तुम्हाला स्वत:चे मूल्य माहिती असेल, तर तुमच्यावर दुसऱ्यांनी केलेल्या टीकेचा कधीच परिणाम होणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Rautela (@meera_rautela)

दुबईत सुट्ट्यांचा आनंद लुटतेय उर्वशी
दुबईत उर्वशी तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्रीने कोणतेही नाव न घेता रिषभ पंतसाठी लवकर बरे होऊन मैदानावर परतण्याची प्रार्थना केली होती. मात्र, मीरा यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता मीरा यांची पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. (actress urvashi rautela s mothers cryptic post after being trolled for cricketer rishabh pant see reaction)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनूने चालत्या ट्रेनच्या दरवाजात बनवला व्हिडिओ; रेल्वेने समाचार घेत म्हटले, ‘चाहत्यांपर्यंत चुकीचा…’
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आर्थिक तंगीचा सामना करत होती तुनिषा? हजार रुपयांनाही झालेली महाग

हे देखील वाचा