चाहत्यांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. उर्वशी ही आपल्या अभिनयाव्यतिरिक्त आपल्या फॅशन सेन्समुळेही जोरदार चर्चेत असते. ती पारंपारिकच नव्हे, तर वेस्टर्न ड्रेसमुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेक्सी डिझायनर बॉडीकॉन गाऊनमधील दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. हे गाऊन दुबईच्या ब्रँड अमेटो काऊचरच्या वॉर्डरोबमधील आहेत. या गाऊनची किंमत वाचून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.
उर्वशीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत तिने खूपच सुंदर स्किन रंगाचा लाँग बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे. यामध्ये ती क्वीवेज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने आपला लूक रफ्ड कॅपसोबत जोडला आहे. हे लांब ट्यूल टेलसोबत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “मला मिस युनिव्हर्सच्या इतिहासात सर्वाधिक आवडती आणि सर्वाधिक फॉलोव्हर्स असणारी भारतीय बनवण्यासाठी धन्यवाद. ही ब्रह्मांडाकडून मिळालेले अप्रतिम भेट आहे, ज्याची मी नेहमीच आभारी राहील.”
याव्यतिरिक्त उर्वशीने दुसरा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हेव्ही एम्ब्रॉयडरी असणारा बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे. यासोबतच तिने एक कॅपही परिधान केली आहे. ही कॅप मेटलच्या पंखाप्रमाणे डिझाईन करण्यात आली आहे. या गाऊनमध्ये तिचे टोंड फिगर दिसत आहे. या व्हिडिओत ती वेगवेगळे पोझ देतानाही दिसत आहे. अभिनेत्रीने आपला लूक एक वेगळ्या हेडगियर आणि मोठ्या हूप ईअरिंग्ससोबत जोडला आहे. (Actress Urvashi Rautela Wears Expensive Bodycon Gowns Do You Know The Cost)
किती आहे या दोन गाऊनची किंमत
या दोन्ही गाऊनमध्ये उर्वशी नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. हा गाऊन जितका सुंदर आहे, तितकाच हा गाऊन महागडाही आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या दोन्ही गाऊनची किंमत १ कोटींपेक्षाही अधिक आहे. विशेष म्हणजे ही किंमत अनेक कंपन्यांच्या सीईओच्या पगारापेक्षाही जास्त आहे.
उर्वशीच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम
-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय