Friday, March 29, 2024

TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये असलेल्या सर्व पात्रांविषयी तुम्हाला माहीतच असेल. मालिकेमधली बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत होती. मालिकेमधील प्रत्येक कलाकार आपली भूमिका चोखपणे पार पाडतात. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे. अशात या मालिकेमध्ये पार्टीचे नाव काढले की, चुटकीत हजर होणाऱ्या रोशन सिंग सोढ़ीच्या खासगी आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

या मालिकेमध्ये रोशन सिंग सोढ़ीचे पात्र साकारणारा गुरुचरण सिंग सध्या जरी या मालिकेमध्ये नसला, तरी त्याने साल २०१३ पासून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. अभिनयाच्या जादूने त्याने चाहत्यांची पसंती मिळवली. मालिकेमध्ये काम मिळवण्याआधी त्याला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे, ते संकटच त्याला या मालिकेपर्यंत घेऊन आले. (Taarak Mehta Ka ooltah chashmah fame actor Roshan Sodhi gurucharan Singh was in Debt)

काय होतं ते संकट?
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये येण्याचे गुरुचरण सिंगने एक मोठे कारण सांगितले. काही दिवसांपूर्वी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लाइव्ह आला होता. त्यावेळी तो म्हणाला की, “माझ्या डोक्यावर खूप कर्ज झालं होतं. लोक त्यांचे पैसे घेण्यासाठी माझ्या मागे लागायचे. त्यांच्याकडून वाचण्यासाठी मी मुंबईमध्ये आलो. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये मला ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये काम मिळाले.”

या मालिकेमधून मोठी प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्याने साल २०१३ मध्ये मालिका सोडली होती. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने पुन्हा एकदा साल २०१४ मध्ये या मालिकेत पुनरागमन केले. त्यानंतर पुन्हा सहा वर्षांनी साल २०२० मध्ये त्याने ही मालिका सोडून दिली. सध्या रोशन सिंग सोढ़ीचे पात्र बलविंदर सिंग सूरी साकारत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा