Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बाबो! ५१.८ डिग्री सेल्सियस तापमानात उर्वशीनं केलं फोटोशूट; व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

बाबो! ५१.८ डिग्री सेल्सियस तापमानात उर्वशीनं केलं फोटोशूट; व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सोशल मीडियावर केल्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. उर्वशी आपल्या चाहत्यांसाठी नेहमी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता उर्वशीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.

सध्या व्हायरल होत असलेला उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ तिच्या नवीन फोटोशूटचा आहे. या व्हिडिओमध्ये तिने खूप दागिने घातलेले दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उर्वशी रौतेलाने हे फोटोशूट ५१.८ डिग्री सेल्सियस तापमानात केले आहे. याचसंदर्भातील माहिती स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. उर्वशीने या फोटोशूटचा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (Actress Urvashi Rautela’s Video Goes To Viral)

या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, उर्वशीने डिझायनर ड्रेस घातला आहे. यासह १५ इंच लांब कानातले आणि कपाळावर मांग टीकाही घातला आहे. त्याचबरोबर उर्वशी रौतेलाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्वशीचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया युजर्स तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दाखवत आहेत. तसेच काही चाहत्यांनी कमेंट देखील केली आहे.

यापूर्वी उर्वशी रौतेला तिच्या पूल फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत अरब सुपरस्टार मोहम्मद रमझान देखील दिसून आला होता. उर्वशीने अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबतचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. उर्वशी आणि रमझानसोबत ‘वर्साचे बेबी’मध्ये दिसली होती. दोघांचे हे गाणे खूप हिट झाले होते. त्याचबरोबर पूलमध्ये दोघांचा एकत्र फोटोही चर्चेत आला आहे.

उर्वशी आणि रमझानचा हा फोटो ‘वर्साचे बेबी’ दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये असे दिसून येत आहे की, उर्वशी तळपत्या गुलाबी रंगाचे टू पीस घालून पूलमध्ये बसलेली आहे. या दरम्यान उर्वशी खूप सुंदर दिसत आहे, तर मोहम्मद रमजान शर्टलेस दिसत आहे. हे फोटो शेअर करताना उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आनंदी ३ महिने #VERSACEBABY मी वेडा होत आहे. मला हे खूप आवडते.”

उर्वशीने सन २०१३ मध्ये आलेल्या ‘सिंग साहब द ग्रेट’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत सनी देओल मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा