Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड आनंदाची बातमी! बॉलिवूडमधून ‘ऑस्कर’साठी दोन चित्रपट नामांकित; एकापेक्षा एक आहे दोघांचीही कहाणी

आनंदाची बातमी! बॉलिवूडमधून ‘ऑस्कर’साठी दोन चित्रपट नामांकित; एकापेक्षा एक आहे दोघांचीही कहाणी

चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये ऑस्कर या पुरस्काराची गणना होते. आपल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक दिग्दर्शक, कलाकाराची इच्छा असते. अशातच बॉलिवूडसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील दोन चित्रपट या पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत.

पुढील वर्षी २७ मार्च, २०२२ मध्ये ९४ व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन केले जाणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतून अनेक चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित होतात. यावेळी ‘ऑस्कर २०२२’साठी विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ आणि विक्की कौशल अभिनित अभिनित ‘सरदार उधम’ हे चित्रपट नामांकित झाले आहेत. दोन्हीही चित्रपटातील कलाकार या खास क्षणी आनंद व्यक्त करत आहेत. दुसरीकडे चाहते आणि इतर कलाकारही यासाठी शुभेच्छा देत आहेत. (Actress Vidya Balan Film Sherni And Vicky Kaushal Film Sardar Udham Nominated For Oscar)

१४ चित्रपट भारतातून ऑस्करसाठी नामांकित
दरवर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी ज्यूरी अनेक चित्रपटांची निवड करते. ज्यूरीने भारतीय चित्रपटसृष्टीतील १४ चित्रपट बाजूला केले आहेत. यातील कोणताही एकच चित्रपट फायनल एन्ट्रीमध्ये सामील होईल. या १४ चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट ‘नायटू’, तमिळ चित्रपट ‘मंडेला’, हिंदी चित्रपट ‘शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘सरदार उधम’ यांचा समावेश आहे.

बॉलिवूडमधून दोन चित्रपट ऑस्करसाठी नामांकित
परदेशी कॅटेगरीत ज्या चित्रपटांना सर्वाधिक दावेदार मानले जात आहे, त्यामध्ये विद्या बालनचा ‘शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा ‘सरदार उधम’ यांचा समावेश आहे. अमित वी मसुरकर दिग्दर्शित ‘शेरनी’ चित्रपटात विद्या बालनने एका वन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जी नरभक्षी वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते.

विकी कौशलने साकारलीय सरदार उधम सिंग यांची भूमिका
दुसरीकडे ‘सरदार उधम’ चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्या भूमिकेत आहे. ही कहाणी त्या क्रांतिकारकाची आहे, ज्याने सन १९१९मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेत एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी मारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा