Wednesday, June 26, 2024

‘भूल भुलैया 3’ मध्ये कसे असेल मंजुलीकाचे पात्र?, विद्या बालनने केला मोठा खुलासा

भूल भुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट ‘भूल भुलैया 3’ ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढण्याचं कारण म्हणजे विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात लोकांना विद्याची आठवण झाली.

विद्या बालनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भूल भुलैया 3’ बद्दल सांगितले. यावेळी प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिची मंजुलिकाची व्यक्तिरेखा पूर्वीपेक्षा वेगळी असणार आहे. या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ती म्हणाली की, “हा काळ वेगळा आहे आणि मीही वेगळी आहे. माझे पात्र तेच असेल, पण पूर्वीपेक्षा वेगळे आहे.”

विद्या बालनने सांगितले की, चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच तिला खूप प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाने तिला खूप काही दिले आहे. ती म्हणाली की, लोक चित्रपटाचा तिसरा भाग एन्जॉय करणार आहेत, कारण हा वेगळ्या प्रकारचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत विद्या म्हणाली की, तिला तो आवडला असून तिला अनीस बज्मीसोबत काम करायचे आहे.

‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालनशिवाय तृप्ती डिमरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडियामध्ये अशीही चर्चा आहे की, कार्तिक आर्यन आणि विद्या बालन एकत्र डान्स करताना दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाणे गणेश आचार्य कोरिओग्राफ करू शकतात. चित्रपटाच्या पहिल्या भागातही विद्या बालनने ‘मेरे ढोलना’ गाण्यावर डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

…म्हणून भाऊ कदमने नाकारला हिंदी शो; म्हणाला, ‘इथे जेवढा मान मिळतो तेवढा तिकडे…’
अपघातानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिले तिचे हेल्थ अपडेट, चाहत्यांचे मानले आभार

हे देखील वाचा