Sunday, April 13, 2025
Home बॉलीवूड दीपिका पदुकोणसोबत ‘या’ अभिनेत्रींनी दिलाय सलमान खानसोबत काम करण्यास नकार

दीपिका पदुकोणसोबत ‘या’ अभिनेत्रींनी दिलाय सलमान खानसोबत काम करण्यास नकार

अभिनेत्री दीपिका पदुकोणने २००७ साली शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी ती हिमेश रेशमिया याच्या ‘नाम मैं तेरा’मध्ये दिसली होती. याआधी तिला सलमान खानाने देखील ऑफर दिली होती. परंतु तिने ती नाकारली होती. दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत सांगितले की, ‘ओम शांती ओम’ आधी सलमानने तिला ऑफर दिली होती. परंतु तिने ती नाकारली होती. कारण त्यावेळी तिला चित्रपट आणि अभिनयात काहीही रस नव्हता.

तिने एका मुलाखतीची सांगितले की, तिने कशाप्रकारे सलमान खानची ऑफर नाकारली होती. तिने सांगितले की, “माझे आणि सलमानचे नाते नेहमीच चांगले होते. मी नेहमीच आभारी असणार आहे की, त्याने मला चित्रपटची ऑफर दिली होती. त्यावेळी मी मॉडेलिंग करत होते. त्यावेळी कोणत्या तरी व्यक्तीने त्याला माझे नाव सुचवले. त्यांना माझ्यातील टॅलेंट दिसले, जे मला देखील माहित नव्हते. (actress who reject salman khan offer to work with him)

बॉलिवूडमध्ये केवळ दीपिकाचा नाही, तर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने सलमान खानच्या चित्रपटाला नकार दिला होता.जाणून घेऊया कोण होत्या त्या अभिनेत्री ज्यांनी सलमान खानच्या चित्रपटाला नकार दिला होता.

अभिनेत्री कंगना रणौतने अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु तिला कोणत्याही खानसोबत काम करायचे नाही. तिने अनेकवेळा मुलाखतीत सांगितले होते की, तिला कोणत्याही खानची गरज नाही. तससह तिने सांगितले होते की तिला सलमान खानसोबत काम करायचे नाही. कारण त्याच्यासोबत काम केळ्यावर सगळे क्रेडिट त्यालाच जाते, त्या अभिनेत्रीला जात नाही.

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने सलमानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात दोघांची केमेस्ट्री सगळयांना खूप आवडली होती. परंतु त्यानंतर तिने सलमानसोबत कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. माध्यमातील वृत्तानुसार तिला सलमान खानसोबत जेवढ्या ऑफर आल्या होत्या तेवढ्या तिने नाकारल्या होत्या.

सोनाली बेंद्रेने देखील सलमान खानसोबतच्या अनेक अनेक ऑफर नाकारल्या होत्या. त्यांनी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. सलमान आणि सोनालीची जोडी त्यावेळी सगळ्यांना खूप आवडली होती. परंतु काही वैयक्तिक कारणांनी तिने पुढील सगळ्या चित्रपटांना नकार दिला.

उर्मिला मातोंडकरचे नाव देखील या यादीत सामील होते. त्यांनी ‘जानम समझा करो’ या चित्रपटात काम केले होते. परंतु त्यानंतर त्यांनी परंत कधीच एकत्र काम केले नाही. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यामुळे तिने परत कधीच सलमान खानसोबत काम केले नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा