×

ऐश्वर्या-सलमान खानच्या ब्रेकअपवर सलीम खान यांनी दिली होती प्रतिक्रिया, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आज जरी ऐश्वर्या कमी चित्रपटांमध्ये दिसत असली, तरी एकेकाळी ती प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. ऐश्वर्याला तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांपासूनच चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या. त्याचबरोबर ऐश्वर्या तिच्या आणि अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) नात्यामुळेही चर्चेत होती.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या लव्ह लाईफपासून ब्रेकअपपर्यंत या दोघांची एकेकाळी बरीच चर्चा केली जात होती. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र, सलमान आणि ऐश्वर्याला त्यांच्या लव्ह लाईफपेक्षा त्यांच्या ब्रेकअपने जास्त चर्चेत आणले. आजही सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपशी संबंधित अनेक किस्से चाहत्यांमध्ये बोलले जातात. चला तर मग सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यावर अभिनेत्याचे सलीम खान (Salim Khan) काय बोलले हे जाणून घेऊया.

माध्यमांतील वृत्तानुसार, सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रतिक्रिया देताना सलीम खान म्हणाले होते की, “सलमान आणि ऐश्वर्यामध्ये मजबूत नाते असेल, तर जगातील कोणतीही शक्ती त्यांना एकमेकांपासून वेगळे करू शकणार नाही. जरी तुम्ही त्यांना मारून टाकले तरी ते अमर प्रेमी बनतील.”

सलीम खान पुढे म्हणाले होते की, “ऐश्वर्या राय एक शिकलेली मुलगी आहे. तिला सलमान खानसोबत असण्याची गरज नाही, ते एकमेकांना आवडले म्हणून ते एकत्र होते.” त्याचवेळी सलीम यांनी एका गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. सलमानबद्दल मीडियामध्ये सातत्याने नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने ते संतापले असल्याचेही समोर आले आहे.

सलीम साहेब म्हणाले होते की, “सलमान ऐश्वर्याला मारतो, काळी जादू करतो, मॅच फिक्सिंग करतो, ही बातमी वर्तमानपत्रात छापणे योग्य आहे का? वृत्तपत्र हे गॉसिप मॅगझिन नाही.” मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार, १९९९ मध्ये सुरू झालेले सलमान खान आणि ऐश्वर्याचे अफेअर २००२ पर्यंत ब्रेकअपमध्ये बदलले होते. त्यांच्या विभक्त होण्याचे कारणही तसेच होते. सलमानच्या असभ्य वर्तनाचा ऐश्वर्याला त्रास होत होता, त्यामुळे तिने सलमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले.

हेही वाचा :

Latest Post