प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने सध्या संपुर्ण सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड तयार केले आहेत.त्यामुळे या चित्रपटातील सर्वच कलाकारांचेही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR), राम चरण (Ram Charan) अजय देवगण (Ajay Devgn) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टनेही (Alia Bhatt) दमदार भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून आलिया भट्टने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दणक्यात एंट्री केली आहे. त्यामुळे सध्या आलिया चांगलीच आनंदात असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र ही संधी आलियाच्या आधी तब्बल सात अभिनेत्रींनी नाकारली होती, आणि त्यानंतर आलियाने या चित्रपटाची ऑफर स्विकारत संधीचे सोने केले आहे. कोण आहेत या नकार देणाऱ्या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
इसाबेल कैफ (Isabail kaif)
ऑलिव्हियाच्या भूमिकेसाठी कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफला विचारण्यात आले होते. त्यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार इसाबेलने चित्रपट नाकारला होता. तिला चित्रपटाची स्क्रिप्ट आणि तपशील हवा होता असे सांगितले जात आहे. ‘टाइम टू डान्स’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सूरज पांचोलीही (Suraj Pancholi) होता.
परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)
परिणीती चोप्राला आरआरआरमध्ये सीतेची भूमिका करण्याची ऑफर आली होती. या चित्रपटात आलिया भट्टने ही भूमिका साकारली आहे. 2019 मध्ये RRR चित्रपट करणार असल्याच्या बातम्यांवरही तिने प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तिने तुम्ही लोक थांबा. गोष्टी जाहीर होऊ द्या. त्यावेळी व्यस्त वेळापत्रकामुळे आलियाने राजामौलींना नकार दिल्याचेही बोलले जात होते. यानंतर परिणीतीला ऑफर देण्यात आली होती. मात्र नंतर हा चित्रपट आलियाच्या पारड्यात गेला.
श्रध्दा कपूर (Shraddha Kapoor)
समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरलाही RRR ची ऑफर मिळाली होती, पण त्यावेळी ती दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होती. त्यावेळी ती दुसऱ्या चित्रपटांमध्ये काम करत होती, पण तिचे नाव राजामौलींच्या यादीत सर्वात वर होते, पण तिला तिच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढता आला नाही. त्यामुळे ही संधी तिला मिळाली नाही.
एमी जॅक्सन (Amy Jackson)
अभिनेत्री एमी जॅक्सनला ऑलिव्हियाची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी चित्रपटात ज्युनियर एनटीआरच्या प्रेयसीची भूमिका करते. यानंतर निर्मात्यांनी एमीला साइन करण्याचा विचार सोडला, कारण ती त्यावेळी गर्भवती होती.
डेझी (Dazy)
ऑलिव्हियाच्या भूमिकेसाठी डेझीला साइन इन केले गेले, परंतु तिने स्वतःच हा चित्रपट सोडला. यामागे तिने खासगी बाब असल्याचे कारण दिले आहे. चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत असल्याने तिने माघार घेतल्याचेही बोलले जात आहे.
किर्ती सुरेश (Kirthy Suresh)
या चित्रपटात श्रेया सरनने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अगदी कमी वेळाची भूमिका असूनही तिच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे. यापूर्वी ही भूमिका कीर्ती सुरेशला ऑफर करण्यात आली होती, परंतु तिने राजामौली यांना नकार दिला होता.
प्रियामणी (Priyamani)
मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रियामणीलाही अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेची ऑफर आली होती, मात्र तिनेही हा चित्रपट केला नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा