काय सांगता! बापरे वयाच्या ६३ व्या वर्षी ‘हा’ हॉलिवूड अभिनेता होणार सातव्यांदा पिता

हॉलिवूड अभिनेता अलेक बाल्डविन(Alec baldwin) त्याच्या सातव्या अपत्याचा बाप होणार आहे. 63 वर्षीय अलेकची पत्नी हिलारियाने (Hilaria Baldwin) ती गर्भवती असल्याची गोड बातमी शेअर केली. आता या अभिनेत्याच्या घरात सातव्यांदा चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाती हत्येनंतर अलेकला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. त्या अपघातात, अलेकने चुकून रस्ट चित्रपटाची सिनेमॅटोग्राफर हॅलिना हचिन्स हिला गोळी मारली होती, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताने अलेक चांगलाच हादरला होता. सध्या अभिनेत्याविरुद्ध या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या पाच महिन्यानंतर, आलेल्या या गोड  बातमीने अलेकच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची लहर पाहायला मिळत आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अलेकची ३८ वर्षीय पत्नी हिलारियाने मंगळवारी इंन्स्टाग्रामवर पती आणि मुलांसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून ही बातमी दिली आहे. त्यामध्ये तिने लिहले की ‘गेल्या काही वर्षात खूप चढ-उतारानंतर, तुमच्यासाठी एक मोठे सरप्राईज आहे, आणखी एक बाल्डविन लवकरच येत आहे. आम्हाला वाटले की आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे पण आता आम्ही या आश्चर्याने आणखी आनंदी आहोत.

View this post on Instagram

A post shared by Hilaria Thomas Baldwin (@hilariabaldwin)

आमचे नवीन पाहुणे आमच्या जीवनाचा प्रकाश आहे. या अनिश्चित काळात एक आशीर्वाद आणि भेट. पुढे तिने तिच्या चाहत्यांसाठी लिहिले- ‘सोशल मीडियावरुन काही काळ लांंब गेल्यानंतर मला तुमची आठवण आली. मी आता परत आली आहे आणि आयुष्य नावाचा हा जंगली प्रवास करायला उत्सुक आहे. तुम्हा सर्वांवर आमचे प्रेम.” सध्या तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान अलेक आणि हिलारिया आधीच सहा मुलांचे आपत्य आहेत. त्यांच्या आता या सातव्या आपत्त्याच्या आगमनाच्या बातमीने त्यांना चांगलाच आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान अलेक हा लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने या क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याची पत्नी हिलारिया ही एक प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून ओळखली जाते. दोघांनी अनेक महिन्यांच्या प्रेम प्रकरणानंतर ३० जून २०१२ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी ‘या’ स्टार अभिनेत्याने केला लोकल ट्रेनमधून प्रवास, व्हिडिओ झाला व्हायरल 

‘मी आता थकलोय’, प्रसिद्ध गायक लकी अली होणार निवृत्त, संगीतविश्वाला करणार बाय-बाय?

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन रेड्डीचे ‘हे’ हिंदी डब सिनेमे आहेत यूटुबवर लोकप्रिय

 

Latest Post