Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

चित्रपटांमध्ये प्रेम, वाद, भांडण या प्रमाणे भुताचे देखील सीन दाखवले जातात. यातील मेंदू सुन्न करणारे भुताचे सीन प्रेक्षकांना फार आवडतात. धीट आणि मोठ्या काळजाची माणसे असे भुताचे चित्रपट आवर्जून पाहतात. अशात भुताचे सीन करताना त्या कलाकाराला तशा पद्धतीचा मेकअप दिला जातो. मेकअप एवढा भयभीत करणारा असतो की, पाहिले तरी काळजात धडकी भरते. परंतु अनेक कलाकार त्यांच्या वाटेला आलेले भुताचे सीन खूप उत्तम पद्धतीने निभावतात.

अशातच काही दिसांपूर्वी ‘भूत पोलिस’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रेक्षकांची काही खास मने जिंकली नाहीत. परंतु यातील यामी गौतमचा अभिनय सर्वांना खूप आवडला. या चित्रपटातील अभिनयासाठी तिने भुताचे सीन केले आहेत. सध्या तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे भुताच्या मेकअपमधील काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो हलक्या काळजाची माणसे, तर अजिबात पाहू शकत नाहीत. यामध्ये ती खूप भयावह दिसत आहे. आपले फोटो पोस्ट करत तिने शूटिंग वेळी घेतलेल्या मेहनतीबद्दल लिहिले आहे. यामीने असे लिहिले आहे की, “मला भुताचे चित्रपट फार आवडतात. त्यामुळेच मी ‘भूत पोलिस’ या चित्रपटामध्ये ही भूमिका साकारू शकले. मला तयार व्हायला ३ तास लागायचे. त्यानंतर सीनमधून बाहेर येण्यासाठी ४५ मिनिटं लागायची. रोज मी अनवाणी पायांनी शूटिंग करत होते. चांदण्यांच्या आवरणात हिमाचलमध्ये रात्री कडाक्याची थंडी होती. माझ्या मानेला देखील दुखापत झालेली, तरी देखील मला हे सर्व करायचे होते. म्हणून मी उत्तम अभिनय साकारू शकले. मी योगाचा खूप सराव केला होता. त्याची मला खूप मदत झाली.”

यामीने पुढे असेही लिहिले की,”मला योगामध्ये तज्ञ व्हायचे होते. परंतु कोरोनामुळे ते शक्य नाही झाले. माझ्या अभिनयामध्ये मला जमेल तेवढं मी सगळं केलं. मला खूप आनंद होतो जेव्हा मी शिकलेल्या योगाचा मला अभिनयामध्येही फायदा होतो. या चित्रपटामध्ये मला झालेला त्रास असह्य होता. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी माझ्या अभिनयाला एवढे प्रेम दिले.”

तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती स्वतःचा मेकअप साफ करताना दिसत आहे. तसेच बाकीच्या व्हिडिओमध्ये तिचा चित्त थरारक अभिनय पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांनी तिच्या या हॉरर लुकला देखील खूप पसंती दिली. यामी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी स्वतःचे वेगवेगळ्या अंदाजामधील फोटो शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच की! ‘अरुदीप’ची नवं गाणं आलं रसिकांच्या भेटीला; त्यांच्या जुगलबंदीने पुन्हा केलं सर्वांना प्रभावित

-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित

-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा

हे देखील वाचा