Friday, July 5, 2024

‘हिना’ चित्रपटातून हिट झालेल्या जेबा बख्तियारने केली आहेत चार लग्न, आता करतेय ‘हे’ काम

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा सुपरहिट चित्रपट ‘हिना’ तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटात हिना नावाच्या मुलीची भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारने साकारली होती. राज कपूर तिच्या सौंदर्याने इतके प्रभावित झाले की, त्यांनी जेबाला ‘हिना’ हा चित्रपट ऑफर केला होता. पहिल्याच चित्रपटात तिला ऋषी कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिका मिळाली. जेबा बख्तियार शुक्रवारी (५ नोव्हेंबर) तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

मोठ्या नेत्याची मुलगी आहे जेबा
जेबा बख्तियार प्रसिद्ध पाकिस्तानी वकील आणि राजकारणी याह्या बख्तियार यांची मुलगी आहे. जेबाचे वडील पाकिस्तानातील क्वेटा शहरातील आहेत, तर आई ब्रिटीश आहे. जेबाचा जन्म ५ नोव्हेंबर १९६२ रोजी झाला. पाकिस्तानमध्ये जेबाचे खरे नाओ शाहीन आहे. तिने लाहोर आणि कतार येथुन तिचे शिक्षण पूर्ण केले. तिने पाकिस्तानी टीव्ही मालिका ‘अनारकली’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

जेबाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘हिना’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. ‘हिना’ या चित्रपटामुळे आजही लोक जब्बाला हिना म्हणूनच आठवतात. हिट चित्रपट दिल्यानंतर जेबा अचानक गायब झाली. वर्षानुवर्षे ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही, चला तर मग जाणून घेऊया ही अभिनेत्री कुठे आहे आणि काय करत आहे…

जेबा आता पाकिस्तानी टीव्ही शोचे दिग्दर्शन करते. ‘हिना’ हा चित्रपट हिट ठरल्यानंतर जेबाच्या कारकिर्दीमध्ये विशेष काही झाले नाही. बॉलिवूडमधील ‘मोहब्बत की आरजू’, ‘स्टंटमॅन’, ‘जय विक्रांता’, ‘सरगम’, ‘मुकदमा’ आणि ‘चीफ साहब’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केले होते.

चारवेळा केले आहे लग्न
जेबाने पहिले लग्न सलमान वलियानीशी केले आणि त्यांना एक मुलगी देखील झाली. पण लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर जेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत १९८९ मध्ये दुसरे लग्न केले. जेबाचे तिसरे लग्न गायक अदनान सामीसोबत असल्याचे बोलले जात आहे. अदनान आणि जेबा यांना एक मुलगा अजान देखील आहे. जेबाने चौथ्यांदा पाकिस्तानच्या सोहेल खान लेघाडीशी लग्न केले. सध्या जेबा पाकिस्तानात आनंदी जीवन जगत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! एका पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी राजीव कपूरशी भिडला होता सलमान खान, वाचा तो किस्सा

-तीन-तीन लग्न करणाऱ्या बॉलीवूडमधील कलाकारांची यादी, एकाने तर सत्तराव्या वर्षी केलं चौथं लग्न

-खऱ्या प्रेमाच्या शोधात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केली चार लग्न, आता आयुष्यात आलंय…

हे देखील वाचा