Wednesday, February 21, 2024

माता सीतेच्या भुमिकेतुन घरोघरी पोहोचल्या या अभिनेत्री, एका अभिनेत्रीचे तर लोक आजही चाहते

दीपिका चिखलिया यांनी ज्या साधेपणाने माता सीतांची भुमिका निभावली आहे. त्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. पण सीता मातेची भुमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलिया या एकट्याच नाहीत तर टीवीवरील बऱ्याच अभिनेत्रींनी सीता मातेची भुमिका केली आहे. चला तर जाणून घेऊया छोट्या पडद्यावर कोणी-कोणी माता सितेची भुमिका साकारली होती .

दीपिका चिखलिया(deepika chikhalia) : रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत दीपिका चिखलियांनी माता सितेची भुमिका निभावून संपुर्ण भारतात त्यांची ओळख निर्माण केली . तो असा काळ होता जेव्हा दीपिकालाच लोक माता सीता (mata sita)म्हणून पाहात होते. ती जिथेही जात होती लोक तिच्या पाया पडुन आशीर्वाद घ्यायचे.

रुबीना दिलैक(rubina dilaik) : ‘देवो के देव महादेव ‘ या टीवी शोमध्ये रुबीना दिलैकने माता सितेची भुमिका साकारली होती. ‘देवो के देव महादेव ‘ ही कलरस ची सर्वांत हिट सिरीयल होती.

देबिना बॅनर्जी(debina banarji) : रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांनीही रामायण बनवलं होतं. या शोमध्ये अभिनेत्री देबीना बॅनर्जीने सीता मातेचे पात्र जिवंत केले होते. या पात्रातुन त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

स्मृती इराणी(smruti irani) : रामानंद सागर यांची रामायण मालिका हिट झाल्यावर बी.आर. चोप्रा यांनीही रामायणावर आधारित टीवी शो बनवला होता. या शोमध्ये स्मृती इराणींनी माता सितेचे पात्र वटवले होते.

मदिराक्षी मुंडले(madirakshi mundle) : ‘ सिया के राम ‘ हा टीवी शोदेखील रामायणावरंच आधारित होता. या टीवी शोमध्ये माता सिताची भुमिका मदिराक्षी मुंडलेंनी केली होती.

शिव्या पठानिया(shivya pathaniya) : कलर्सचा शो ‘राम सिया के लव-कुश ‘मध्ये माता सितेची भुमिका शिव्या पठानियाने निभावला होता. या शोमुळे अभिनेत्रीला खुप प्रसिद्धी मिळाली होती.

हे देखील वाचा