Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल

काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने वर्ष २००० मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तिने एकामागून एक हिट चित्रपट देण्यास सुरुवात केली. पुढे तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ती फक्त बॉलिवूडचीच नाही, तर हॉलिवूडचीही एक नामांकित अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या आकर्षक अंदाज, सुंदरता, आणि जबरदस्त फिगर यासाठी प्रसिद्ध आहे. यामागील गुपीत नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. हे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही स्वत: मध्ये हा बदल कराल.

यात काहीच शंका नाही की, तिच्या उत्कृष्ट दिसण्यामागे रोजचा व्यायाम, आणि कठोर आहार यांची जबरदस्त योजना आहे. प्रियांका चोप्रा घाम गाळण्यासाठी जिममध्ये जाण्यास अजिबात संकोच करत नाही, परंतु आहार योजना, आणि शिस्तबद्ध वर्कआऊटच्या नियमांमुळे, ती स्वतःला सगळ्याच बाबतीत नीट ठेवू शकते.

प्रियांकाच्या सुंदर फिगरमागील कारण हे तिचे डाएट प्लॅन आणि वर्कआउट आहे. स्वत: ला सक्रिय, आणि उत्साही ठेवण्यासाठी तिला दर दोन तासांनी शेंगदाण्यासह, नारळाचे पाणी प्यायला आवडते. त्याचबरोबर, कधीकधी ती चॉकलेट आणि केक खायला कधीही विसरत नाही. या व्यतिरिक्त प्रियांका आपल्या रोजच्या आहारातील जीवनसत्त्वे, आणि प्रथिने यांची कमतरता भरून आणण्यासाठी, हिरव्या भाज्या आणि फळे खात असते.

न्याहारीसाठी प्रियांकाला दोन अंडी, किंवा एक ग्लास साय काढलेले दुध घ्यायला आवडते. दुपारच्या जेवणात प्रियांकाला २ चपाती, डाळ, कोशिंबीर आणि भाजी खायला आवडते. संध्याकाळी जेव्हा प्रियंकाला भूक लागते, तेव्हा तिला सँडविच किंवा मोड आलेल्या कडधान्याची कोशिंबीर आवडते. तसेच रात्रीच्या जेवणात ती सहसा सूप, भाजलेले चिकन, किंवा मासे खाते.

प्रियांका चोप्राच्या व्यायामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आठवड्यातून ४ दिवस व्यायाम करते. ज्यात हृदयाचा, वजन प्रशिक्षण तसेच प्राणायाम यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल, पाहा काय घातलाय राडा?

-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!

-कोरोनाविरुद्धच्या लढाईत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची उडी, आपल्या मोहिमेत सहभागी होण्याचे चाहत्यांना केले आवाहन

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

हे देखील वाचा